शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 09:58 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्दे उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं.उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, सोमवारी (10 डिसेंबर) त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. 

कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा

मनमोहन सिंग यांनी ‘उर्जित पटेल हे एक मोठे अर्थशास्त्री होते. भारतातील आर्थिक संस्था आणि आर्थिक नितींबाबत अत्यंत काळजी असणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा देणं दुर्दैवी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे’ असं म्हटलं आहे. तसेच ‘केंद्राचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीकडे असल्याचा संशय आरबीआयकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता, आता तसं काही घडणार नाही अशी मी अपेक्षा ठेवतो’ असंही सिंग म्हणाले आहेत. 



उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, मंगळवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती येत आहे. त्यामध्ये भाजपा सरकारच्या विरोधात एक्झिट पोलचे सर्वेक्षण आहे. त्यामुळे उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकारसोबतच्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, यापूर्वी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. राजन यांच्या निर्णयानंतरही देशभरात खळबळ उडाली होती. तर, उद्योगजगताने राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यावेळी नोंदवली होती.

टॅग्स :Urjit Patelउर्जित पटेलManmohan Singhमनमोहन सिंग