Amit Shah : "राहुल गांधी खोटं बोलून दिशाभूल करतात, खोटेपणाची फॅक्टरी..."; अमित शाह यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:52 IST2026-02-14T15:51:53+5:302026-02-14T15:52:40+5:30
Amit Shah And Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या आक्रमक पवित्र्यात असून केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

Amit Shah : "राहुल गांधी खोटं बोलून दिशाभूल करतात, खोटेपणाची फॅक्टरी..."; अमित शाह यांचा हल्लाबोल
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या आक्रमक पवित्र्यात असून केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारावरूनही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी स्पष्ट केलं की, मुक्त व्यापार करार (FTA) आणि इतर व्यापारी करारांमध्ये शेतकरी व मच्छिमारांच्या हिताचं पूर्णपणे रक्षण करण्यात आलं आहे.
राहुल गांधी 'खोटं' बोलून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही अमित शाह यांनी केला. पुडुचेरीतील कराईकल येथे भारतीय जनता पक्षाच्या एका भव्य सभेत बोलताना शाह म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "दररोज खोटं बोलण्याची एक नवीन परंपरा सुरू केली आहे."
Modi Ji gave 100% protection to farmers, fishermen, and cattle herders in free trade agreements. There are no takers for Rahul Gandhi's manufactured lies. pic.twitter.com/yAiIYP1r2z
— Amit Shah (@AmitShah) February 14, 2026
"खोटे बोलणं, जोर-जोरात खोटं बोलणं आणि तेच पुन्हा पुन्हा सांगणं ही राहुल गांधींची नीती आहे. मात्र तुमची ही 'खोटेपणाची फॅक्टरी' आता लोकांनी ओळखली आहे." अमित शाह यांनी सांगितलं की, मुक्त व्यापार करार आणि विशेषतः भारत-अमेरिका करारातील तरतुदींचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकरी आणि मच्छिमारांसाठी '१०० टक्के सुरक्षा सुनिश्चित' केली आहे. याचवेळी त्यांनी आरोप केला की, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं हित 'विकलं' गेलं होतं. २०२९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला.