शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:12 IST

"भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते."

Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra :काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राहुल यांना 'भारत जोडो' यात्रेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "या दौऱ्यामुळे माझा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. भारतीय राजकारणात प्रेमाचा परिचय करुन देणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता. या दौऱ्यात मला अनेक धडे मिळाले, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम ही संकल्पना राजकारणात राबवता येते."

भारत जोडो यात्रा का करावी लागली?यावेळी राहुल गांधींनीभारत जोडो यात्रा सुरू करण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, "भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. मी संसदेत दिलेले भाषण टीव्हीवर दाखवले जात नव्हते, माध्यमांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मला कायदेशीर मदतही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आमच्या लक्षात आले की, माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचू शकत नसलो, तरी थेट लोकांपर्यंत जाणे हाच उत्तम मार्ग आहे. त्यामुळेच मी देशभरात 4000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला."

ही आध्यात्मिक यात्रा होती"सुरुवातीला गुडघ्याच्या समस्येमुळे मला अडचणींचा सामना करावा लागला. पहिले 3-4 दिवस वाटले की, आपण यात्रा काढून चूक केली. पण, हळुहळू मला याची सवय झाली. या दौऱ्याने माझा लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून गेला. या दौऱ्याचा सर्वात प्रभावशाली पैलू म्हणजे, भारतीय राजकारणात 'प्रेम' या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः 'प्रेम' सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले. ही फक्त भौतिक यात्रा नव्हती, तर एक आध्यात्मिक यात्राही होती, ज्यामुळे आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला," असेही राहुल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा