शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

"चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही"; पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत भाग घेतला

PM Narendra Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला पॉडकास्ट इंटर्व्हू आहे. निखिल कामथ यांनी गुरुवारी या मुलाखतीचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी जगातील युद्ध परिस्थिती, राजकारणातील तरुणांचा प्रवेश, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चुका होतात, मीही त्या केल्या असत्या कारण मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही, असंही म्हटलं.

भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' या पॉडकास्ट शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. निखिल कामथ यांनी पॉडकास्टच्या या भागाचा दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी माझ्यासाठी पॉडकास्ट पहिल्यांदाच घडत आहे, मला माहित नाही की ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचेल, असं म्हटलं. या ट्रेलरला ‘पीपल विथ पंतप्रधान नरेंद्र मोदी, ट्रेलर ऑफ एपिसोड सिक्स’ असं कॅप्शन दिलं आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी आणि निखिल कामथ यांच्यातील मजेशीर संभाषण देखील दाखवण्यात आले आहे.

मुलाखतीमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना अनेक रोचक प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनीही या प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. पहिल्या टर्ममध्ये मी दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या टर्ममध्ये हे सगळं अधिक चांगले समजू लागले, असं पंतप्रधान मोगी म्हणाले. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.

राजकारणातील तरुणांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे, असं म्हटलं. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. "चुका होतात, माझ्याकडूनही त्या झाल्या असतील. मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

ट्रेलरमध्ये कामथ यांनी मी तुमच्यासमोर बसून बोलत आहे आणि मी घाबरलो पण आहे. हे माझ्यासाठी कठीण आहे, असं देखील म्हटलं. त्यावर बोलताना, "हे माझे पहिले पॉडकास्ट आहे, मला माहित नाही की तुमच्या प्रेक्षकांना हा ट्रेलर कसा वाटेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत