शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या कारमधून तरुणाला खेचले बाहेर; फिल्मी स्टाईल रेस्क्यू करत तरुण बनला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:44 IST

उत्तर प्रदेशात एका कारचा विचित्र अपघात झाल्यानंतर चालकाला वाचवण्यात यश आलं.

UP Car Accident: उत्तर प्रदेशातील पीलीभीतशहराच्या मध्यभागी असलेल्या टनकपूर हायवेवर गुरुवारी सकाळी एक थरारक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील प्रमुख गौहनिया तलावाजवळ एक भरधाव अर्टिगा कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्यात कोसळली आणि बुडू लागली. कारमध्ये शिवम नावाचा तरुण अडकला होता आणि त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर या तरुणाला वाचवण्यात यश आलं.

या धोकादायक परिस्थितीतही क्षणाचाही विलंब न लावता, तलावात मासेमारी करत असलेल्या एका नाविकाने आणि हायवेवरून जात असलेल्या दिनेश कुशवाहा नावाच्या एका  तरुणाने आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेतली. हे बचाव कार्य एखाद्या फिल्मी दृश्यापेक्षा कमी नव्हता. कार काही मिनिटांतच पाण्यात पूर्णपणे बुडत होती आणि आत अडकलेला चालक मदतीसाठी धडपडत होता. जमावाने आरडाओरड सुरू केली, पण कोणीही पुढे सरसावत नव्हते. याचवेळी, मासेमारी करणारा तरुण आणि दिनेश धाडस दाखवत बुडणाऱ्या कारपर्यंत पोहचले.

नाविकाने पूर्ण ताकद लावून कारच्या काचेजवळून आत झुकून बुडत असलेल्या शिवमचा हात पकडला आणि त्याला पाण्याबाहेर खेचले. त्याच वेळी, दिनेशनेही पाण्यात उडी मारून नाविकला मदत केली आणि जखमी चालकाला सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत आणले.

देवदूत बनून आला नाविक आणि दिनेश

जखमी चालक शिवमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोन तरुणांच्या अतुलनीय शौर्याचे आणि वेळेवर दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सीओ सिटी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले. 

दरम्यान, या घटनेनंतर गौहनिया तलावाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील मध्यभागी असूनही, या तलावाच्या बाजूला कोणतीही बॅरिकेडिंग, फेंसिंग  लावलेला नाही. स्थानिक रहिवासी आणि नगरसेवकांनी अनेक वर्षांपासून सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु पालिका आणि जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Rescued from Sinking Car in Dramatic Pilibhit Rescue

Web Summary : In Pilibhit, a young man was rescued from a sinking car by a fisherman and a passerby who jumped into the lake. The driver was hospitalized. Locals are demanding safety measures for the unfenced lake after the incident.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात