बोलण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधी परदेश दौर्‍यावर जातात; शाहांच्या टीकेवर लोकसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:33 IST2026-03-11T18:31:03+5:302026-03-11T18:33:02+5:30

'अमित शाह माफी मागा..', विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी

Parliament session When time comes to speak, Rahul Gandhi is on a foreign tour; Lok Sabha is in chaos over Amit Shah's criticism | बोलण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधी परदेश दौर्‍यावर जातात; शाहांच्या टीकेवर लोकसभेत गोंधळ

बोलण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधी परदेश दौर्‍यावर जातात; शाहांच्या टीकेवर लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या लोकसभेतील भाषणादरम्यान जोरदार गोंधळ झाला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत शाहांनी माफी मागाव्याची मागणी केली. गोंधळाच्या वातावरणातही अमित शाह यांनी आपले भाषण सुरू ठेवले.

राहुल गांधींवर अमित शाहांची टीका

सभागृहात बोलताना अमित शाह म्हणाले की, जेव्हा विरोधी पक्षनेते बोलण्याची वेळ येते, तेव्हा जर्मनी किंवा इंग्लंडच्या दौर्‍यावर असतात. 18व्या लोकसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी 157 तासांहून अधिक वेळ बोलले, पण विरोधी पक्षनेते किती वेळ बोलले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कोणालाही बोलण्यापासून रोखले जात नाही, मात्र लोकसभेची बदनामी करण्यासाठी चुकीचा प्रचार केला जात आहे, अशी टीका शाहांनी केली.

परदेशात असलेला सदस्य येथे कसा बोलेल?

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, ते अनेकदा संसदेच्या सत्रादरम्यान परदेशात असतात. जो व्यक्ती जर्मनी, इंग्लंड किंवा सिंगापूरमध्ये आहे, तो इथे कसा बोलेल? संसदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा नाही. शाहांनी यावेळी राहुल गांधींच्या संसदीय उपस्थितीचाही मुद्दा उपस्थित केला. 17व्या लोकसभेत राहुल गांधी यांची उपस्थिती सुमारे 51 टक्के होती, तर 16व्या लोकसभेत ती 52 टक्के होती, असे शाहांनी सांगितले.

अनेक महत्त्वाच्या चर्चांपासून अनुपस्थित

अनेक महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चांमध्ये राहुल गांधी सहभागी झाले नाहीत. वित्त विधेयक, वक्फ विधेयक, तसेच इतर महत्त्वाच्या चर्चांमध्ये त्यांनी भाग घेतला नाही. हिवाळी अधिवेशनादरम्यानही ते अनुपस्थित होते, असा आरोप अमित शाहांनी केला. शाहांच्या वक्तव्यांनंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “अमित शाह माफी मागा” अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

सभागृह जत्रा नाही, इथे नियमांनुसारच बोलावे लागेल; अमित शाहांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

आणीबाणीचा उल्लेख

अमित शाह यांनी 1975 मधील आणीबाणीचा उल्लेख करत सांगितले की, त्या काळातच खऱ्या अर्थाने विरोधकांचा आवाज दाबला गेला होता. आम्ही कधीही विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले नाही, असे ते म्हणाले. शाहांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरही आक्षेप घेतला. पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, त्याचे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र स्पीकरविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे योग्य नाही, असे शाहा म्हणाले. 

Web Title : राहुल गांधी पर शाह की आलोचना से लोकसभा में हंगामा

Web Summary : अमित शाह ने राहुल गांधी की महत्वपूर्ण संसदीय सत्रों के दौरान अनुपस्थिति की आलोचना की, जिससे हंगामा मच गया। शाह ने गांधी की उपस्थिति और महत्वपूर्ण बहसों में भागीदारी पर सवाल उठाया, जिससे विपक्षी सदस्यों ने विरोध प्रदर्शन किया और माफी की मांग की।

Web Title : Shah's criticism of Rahul Gandhi disrupts Lok Sabha proceedings.

Web Summary : Amit Shah criticized Rahul Gandhi's absence during crucial parliamentary sessions, sparking uproar. Shah questioned Gandhi's attendance and participation in key debates, leading to protests and demands for an apology from opposition members.