Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...

शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:52 IST2026-05-15T09:51:45+5:302026-05-15T09:52:52+5:30

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.

Stock market geared up rally Sensex Nifty rally increases investor expectations shares in it metal sector top gainer | शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...

शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास उंचावला असून, विशेषतः आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून आली.

शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स १००.६५ अंकांनी (०.१३%) वधारून ७५,४९९.३७ वर उघडला. तर निफ्टी ५५.५० अंकांनी (०.२३%) वधारून २३,७४५.१० च्या पातळीवर व्यवहार करत होता. यानंतर त्यात आणखी वाढ झाली. गेल्या काही सत्रांतील घसरणीनंतर आयटी क्षेत्रात जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळाली. निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे १.५२% च्या वाढीसह व्यवहार करत होता. तज्ज्ञांच्या मते, शेअर्सच्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर 'व्हॅल्यू बाइंग' केलं आहे.

पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके

ऑटो क्षेत्राचीही दमदार कामगिरी

आयटी क्षेत्राप्रमाणेच ऑटो सेक्टरमध्येही मोठी तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटो इंडेक्स १.११% नं वधारला. वाहन उद्योगातील वाढत्या मागणीच्या अपेक्षेमुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला असून, आगामी काळातही ही तेजी कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.

मेटल आणि पीएसयू बँकांवर दबाव

एकीकडे आयटी आणि ऑटोमध्ये तेजी असताना, दुसरीकडे मेटल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. जागतिक बाजारातील धातूंच्या किमतीतील चढ-उतार आणि बँकिंग क्षेत्रातील नफावसुलीमुळे या क्षेत्रातील निर्देशांक रेड झोनमध्ये होते.

गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित

सुरुवातीच्या व्यवहारातील या मजबुतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जागतिक बाजारपेठेतून मिळालेले सकारात्मक संकेत आणि निवडक क्षेत्रांमधील खरेदीमुळे भारतीय बाजारात सध्यातरी चांगले वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : शेयर बाजार 'हाई'; सेंसेक्स-निफ्टी में तेजी, निवेशकों की उम्मीदें बढ़ीं

Web Summary : भारतीय शेयर बाजार की शुरुआत सकारात्मक रही। सेंसेक्स और निफ्टी में उछाल, निवेशकों का आत्मविश्वास बढ़ा। आईटी और ऑटो क्षेत्र में तेजी, जबकि धातु और पीएसयू बैंकों पर दबाव। वैश्विक संकेतों से बाजार को समर्थन।

Web Title : Stock Market 'High'; Sensex-Nifty Surge Boosts Investor Expectations

Web Summary : Indian stock market opens positively. Sensex and Nifty rise, boosting investor confidence. IT and auto sectors lead gains, while metal and PSU banks face pressure. Positive global cues support market sentiment.