डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 08:16 IST2026-05-15T08:10:01+5:302026-05-15T08:16:36+5:30

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज १५ मे रोजी पहाटे ४.३० ते ५  वाजण्याच्या दरम्यान दुख:द निधन झाले. त्यांचे वय 68 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती.

Dr. Anand Nadkarni passes away; took his last breath at the age of 68 | डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ठाणे : डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज १५ मे रोजी पहाटे ४.३० ते ५  वाजण्याच्या दरम्यान दुख:द निधन झाले. त्यांचे वय 68 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. अंतिम दर्शन ठाणे येथील सप्तसोपान येथे १०.३० वाजता घेता येईल.

डॉ. आनंद मधुसूदन नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचारशास्त्र विषयात एमडी पदव्युत्तर पदवी मिळवली.ते गेल्या तीन दशकांपासून मानसोपचार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होते. त्यांनी मानसिक आरोग्याची संकल्पना समाजातील जवळपास प्रत्येक संभाव्य स्तरापर्यंत पोहोचवली आहे आणि ते विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करत होते.

डॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य आहेत. डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती. .

Web Title : डॉ. आनंद नाडकर्णी का 68 वर्ष की आयु में निधन

Web Summary : मनोचिकित्सक डॉ. आनंद नाडकर्णी, मुक्तांगन के संस्थापक, का सर्जरी के बाद 68 वर्ष की आयु में निधन हो गया। मानसिक स्वास्थ्य और व्यसन मुक्ति में उनके काम के लिए जाने जाते है। उन्होंने साहित्य और रंगमंच में योगदान के लिए पुरस्कार भी प्राप्त किए।

Web Title : Dr. Anand Nadkarni Passes Away at 68

Web Summary : Dr. Anand Nadkarni, psychiatrist and founder of Muktangan, passed away at 68 after surgery complications. Known for his work in mental health and addiction treatment, he also authored books and plays, receiving awards for his contributions to literature and theatre.