व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:20 IST2026-05-15T09:19:44+5:302026-05-15T09:20:31+5:30
Whatsapp AI Private Chat: वापरकर्ते एआयला आरोग्य, आर्थिक व्यवहार वा वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्न विचारतात.

व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
लंडन : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेत मेटा प्लॅटफॉर्मने एक घोषणा केली आहे. वापरकर्त्यांना ‘मेटा एआय’ या चॅटबॉटसोबत खासगी संवाद साधता यावा, यासाठी ‘इन्कोग्निटो मोड’ लाँच करण्यात येत आहे. यामुळे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित राहणार आहे.
वापरकर्ते एआयला आरोग्य, आर्थिक व्यवहार वा वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्न विचारतात. ही माहिती सुरक्षित राहावी म्हणून मेटाने हे पाऊल उचलले आहे. इन्कोग्निटो मोडमधील मेसेजेस खुद्द मेटालाही ते पाहता येणार नाहीत.
सुरक्षेला प्राधान्य
हानिकारक विषयांवरील प्रश्नांना चॅटबॉट प्रतिसाद देणार नाही. या मोडमध्ये केवळ मजकूर स्वरूपात प्रश्न विचारू शकता.
‘इन्कोग्निटो मोड’ वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या वयाची खात्री करावी लागेल. अल्पवयीन मुलांना हे फिचर वापरता येणार नाही. मेटा १३ वर्षांखालील मुलांना प्लॅटफॉर्मवर परवानगी देत नाही.