शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या; असदुद्दीन ओवैसींचं अजब तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:44 AM

एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

ठळक मुद्देएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेकाँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं आहे. तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर स्थानिकांना त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचं अपील केलं आहे. 

नवी दिल्लीः एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं आहे. तसेच तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर स्थानिकांना त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचं अपील केलं आहे. काँग्रेसच्या लोकांजवळ भरपूर पैसा आहे. तो त्यांच्याकडून मिळवा. तो पैसा माझ्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या आणि फक्त मला मतदान करा. जर तुम्हाला ते लोक पैसे देत असतील तर घ्या, काँग्रेसनं आपला दरही वाढवला पाहिजे. माझी किंमत फक्त दोन हजार ठरवू नये, मी त्याहून अधिक मूल्यवान आहे, असा टोलाही ओवैसींनी काँग्रेसला हाणला आहे.  12 जानेवारीला तेलंगणातल्या भैंसामध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. ज्यात 13 घरं आणि 26 वाहनं जळून बेचिराख झाली होती. या घटनेसंदर्भातही ओवैसींनी यांनी निषेध नोंदवला आहे. ओवैसी म्हणाले, ही घटना निषेधार्ह होती. मी मुख्यमंत्र्यांकडे अपील करतो की, आरोपींविरोधात कारवाई करा, ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, त्यांना लवकरात लवकर भरपाई द्या. तसेच भैंसाच्या जनतेनंही शांतता कायम ठेवावी, असं अपीलही त्यांनी केलं आहे. तर एनआरसीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पहिल्यांदा सरकारने एनआरसी लागू करणे गरजेचे होते. सरकार देशातील १२० कोटी जनतेला रांगेत उभं करणार आहे आणि त्यानंतर त्यांना कागदपत्रे मागणार आहे. हिंदूंना वाटतं म्हणून देश धर्मनिरपेक्ष नाही तर संविधानाने देशाला सेक्युलर बनवले आहे. संविधानाच्या अधीन राहून जे निर्णय होतात तसे त्याला आव्हान देण्याचा अधिकारही संविधानाने दिला आहे असं असदुद्दीने ओवैसी यांनी सांगितले.  नागरिकता धर्म या चर्चासत्रादरम्यान, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाद रंगला होता. एकीकडे मुख्तार अब्बास नकवी सरकारने आणलेल्या विधेयकाचे जोरदार समर्थन करत होते तर असदुद्दीने ओवैसी सरकारच्या कायद्याविरोधात त्रुटी काढत होते.   

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी