शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:37 IST

बिहारमध्ये मतदार यादीच्या सुधारणेविरुद्ध विरोधी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी संसदेबाहेर एक अनोखा निषेध पाहायला मिळाला.

बिहारमध्ये मतदार यादीच्या सुधारणेविरुद्ध विरोधी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी संसदेबाहेर एक अनोखा निषेध पाहायला मिळाला. यात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेते एका महिलेच्या फोटोसह मिंता देवी असे लिहिलेले टी-शर्ट घालून दिसले. या टी-शर्टच्या मागे ट१२४ नॉट आउट असे लिहिण्यात आले. दरम्यान, सिवान जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणामुळे पहिल्यांदाच एका १२४ वर्षीय महिलेचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे,  ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

हे संपूर्ण प्रकरण दरौंडा विधानसभा मतदारसंघातील सिसवान ब्लॉकच्या सिसवा कला पंचायतीच्या अर्जनीपूर गावाचे आहे. या गावातील मतदार यादीत मिंता देवी नावाच्या १२४ वर्षीय महिलेचे नाव नोंदवण्यात आले. पहिल्यांदाच या महिलेचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, अर्जनीपूर गावातील रहिवासी धनंजय कुमार सिंह यांच्या पत्नी मिंता देवी यांचे खरे वय फक्त ३५ वर्षे आहे. बूथ लेव्हल ऑफिसर उपेंद्र शाह यांनीही डेटा एन्ट्री करताना ही चूक झाल्याचे मान्य केले. ऑनलाइन फॉर्म भरताना वयात चूक झाली. त्यामुळे त्यांचे वय १२४ दाखवले जात आहे, यात दुरूस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी बिहार मतदार यादीच्या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकतेबद्दल शंका उपस्थित केली. बिहारमध्ये जारी केलेल्या एसआयआरबाबत आधीच वाद आहे, जिथे मोठ्या संख्येने मतदारांचे नावे काढून टाकले जात आहेत. शिवाय, चुकीच्या नोंदी समोर आल्या आहेत. अशा चुका होत असतील तर त्याचा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल, असे विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे आहे. यावर निवडणूक आयोगाने तांत्रिक चुका सामान्य आहेत आणि त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात, असे स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस