शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:37 IST

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, भारत 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना परत आणत आहे. सोमवारी महान एअरच्या विशेष विमानाने २९० प्रवासी दिल्लीत पोहोचले.

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले जाणारे ऑपरेशन सिंधू सुरूच आहे. सोमवारी रात्री महान एअरचे एक विशेष विमान २९० प्रवाशांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

भारताने आतापर्यंत २००३ भारतीयांना इराणमधून परत आणले आहे. दिल्लीला पोहोचलेल्या प्रवाशांमध्ये श्रीलंकेची एक महिला फातिमा इमान देखील आहे. भारत सरकारचे आभार मानताना फातिमा म्हणाली की ती ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे तिथे अनेक भारतीय विद्यार्थी आहेत.

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

सर्व भारतीय घरी परतत असल्याची माहिती मिळताच तिने श्रीलंकेच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, श्रीलंका आणि भारताच्या दूतावासांशी समन्वय साधून तिचा प्रवासाचे नियोजन केले.

फातिमा म्हणाली की, इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि तिथे राहणे सुरक्षित नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल आणि विद्यार्थी पुन्हा इराणला जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील अशी आशा आहे. बिहारमधील सिवान येथील सय्यद वाजी हैदर, जे प्रवाशांमध्ये होते, त्यांनी सांगितले की, भारतात परतल्यानंतर समाधान वाटत आहे.

श्रीलंकेच्या महिलेने भारत सरकारचे कौतुक केले

भारतीय दूतावास आणि भारत सरकारने केलेल्या व्यवस्थेचे तिने कौतुक केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या विशेष विमानाने २९० भारतीय नागरिक आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाला बाहेर काढण्यात आले.

आतापर्यंत किती नागरिकांना परत आणले?

पहिले विमान शुक्रवारी रात्री उशिरा २९० भारतीयांसह नवी दिल्लीत उतरले आणि दुसरे विमान शनिवारी दुपारी ३१० भारतीयांसह उतरले. गुरुवारी येरेवनहून आणखी एक विमान आले. शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे.

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायल