शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:50 IST

Waqf Amendment Act: वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने वादी आणि प्रतिवादींचा युक्तिवाद ऐकून घेत संसदेने पारित केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. 

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने वादी आणि प्रतिवादींचा युक्तिवाद ऐकून घेत संसदेने पारित केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं.  संसदेकडून पारित करण्यात आलेल्या कायद्यामध्ये घटनात्मक विचार असतो. तसेच त्यापैकी कुठलाही कायदा घटनात्मक नसल्याबद्दल कुठलाही सबळ पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, त्यांनी अंतरिम आदेश पारित करण्यासाठी वक्फ संशोधन अधिनियमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी तीन मुद्द्यांपुरतीच मर्यादित करावी. त्यामध्ये त्यामध्ये कोर्ट, युजर आणि डीडद्वारे घोषित वक्फ मालमत्तांना डि-नोटिफाय करण्याच्या बोर्डाच्या अधिकारांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर ही विनंती केली. तुषार मेहता यांनी सांगितले की, कोर्टाने तीन मुद्दे अधोरेखिल केले होते. मात्र या मुद्द्यांशिवाय इतर मुद्द्यांवरही सुनावणी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र आम्ही या तीन मुद्द्यांना उत्तर म्हणून आपलं शपथपत्र दाखल केलं आहे. आमची विनंती आहे की, ही सुनावणी केवळ वरील तीन मुद्द्यांपुरतीच मर्यादित ठेवण्यात यावी, अशी मागणी तुषार मेहता यांनी केली.

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्यावतीने कोर्टात बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र केंद्र सरकारने केलेल्या युक्तिवादाला विरोध केला. तसेच महत्त्वपूर्ण कायद्यावर तुकड्यांमध्ये सुनावणी होऊ शकत नाही, असे सांगितले. संशोधन केलेला कायदा हा घटनेच्या कलम २५ चं उल्लंघन करतो, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारkapil sibalकपिल सिब्बल