उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:36 AM2021-09-21T11:36:20+5:302021-09-21T11:37:02+5:30

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतीं यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

ncp leader rohit pawar criticize uma bharati statement of bureaucrats madhya pradesh twitter | उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका

उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका

googlenewsNext
ठळक मुद्दे'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; उमा भारतीं यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात,' असं उमा भारती म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. भाजप नेत्या उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.

"भाजप नेत्या उमा भारती यांचं अधिकाऱ्यांबाबतचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. केंद्र सरकारकडून ED, CBI, IT या केंद्रीय संस्थांचा होणारा गैरवापर बघितला तर हेच वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांबाबत न करता या संस्थांबाबत केलं असतं तर योग्य ठरलं असतं," असं म्हणत रोहित पवार यांनी उमा भारती यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला.


काय म्हणाल्या होत्या उमा भारती?
मध्यप्रदेशात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. "नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसं अजिबात नाही," असं त्या म्हणाल्या होत्या.

आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाईल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो', असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं होतं.

Web Title: ncp leader rohit pawar criticize uma bharati statement of bureaucrats madhya pradesh twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.