शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

भन्नाट शोध! प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 9:35 AM

हैदराबादमधील मेकॅनिकल इंजिनियरचा शोध

हैदराबाद: बेसुमार प्लास्टिक आणि कमी होत चाललेलं इंधन या समस्यांवर एका मेकॅनिकल इंजिनियरनं रामबाण उपाय शोधला आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्राध्यापक सतीश कुमार यांनी प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांनी कंपनीचीही स्थापना केली आहे. अवघ्या तीन टप्प्यांमध्ये प्लास्टिकपासून इंधन करण्याचं तंत्र त्यांनी शोधून काढलं आहे. प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या पदार्थाला सतीश यांनी प्लास्टिक पायरोलिसिस असं नाव दिलं आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करुन त्यापासून डिझेल, पेट्रोल आणि उड्डाण क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या इंधनाची निर्मिती करण्याचं काम आम्ही करतो, असं सतीश यांनी सांगितलं. 'पुनर्प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या 500 किलो प्लास्टिकपासून 400 लिटर इंधन मिळू शकतं. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासत नाही. यामधून हवेचं प्रदूषणही होत नाही. कारण एका निर्वात पोकळीत ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते,' अशी माहिती कुमार यांनी दिली. प्लास्टिकवर प्रक्रिया करुन इंधनाची निर्मिती करण्यासाठी सतीश यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाच्या अंतर्गत कंपनी सुरू केली आहे. 2016 पासून त्यांनी पुनर्प्रक्रिया न होऊ होऊ शकणाऱ्या 50 टन प्लास्टिकचं इंधनात रुपांतर केलं आहे. सध्या त्यांची कंपनी दिवसाला 200 किलो प्लास्टिकपासून 200 लिटर पेट्रोलची निर्मिती करते. चाळीस ते पन्नास रुपये प्रति लिटर दरानं या पेट्रोलची विक्री केली जाते. मात्र अद्याप या इंधनाचा वाहनांमध्ये वापर करण्यात आलेला नाही. या इंधनावर वाहनं चालू शकतात का, याची चाचणी अद्याप शिल्लक आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी