शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:35 IST

Maha Kumbh: येत्या 26 जानेवारीला साधू-संतांच्या उपस्थितीत वैदिक रितीरिवाजांनुसार या दोघांचे लग्न होणार आहे.

MahaKumbh 2025: पवित्र त्रिवेणी संगणावर वसलेल्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. म्हणूनच, या पवित्र महाकुंभात भारतासह जगभरातून भाविक येत आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका तरुणाने या पवित्र महाकुंभातून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ नावाचा तरुण कुंभमेळ्यात लग्नबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे, त्याची होणारी पत्नी ग्रीस देशाची रहिवासी आहे. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक साधू-संत लग्नात हजेरी लावणार आहेत.

पवित्र त्रिवेणी संगमाचे स्थान सृष्टीचा केंद्रबिंदू असून, धर्म आणि अध्यात्माचा प्रवाह येथूनच उगम पावतो, हे वास्तव सर्वश्रुत आहे. येथे देवीदेवतांचा वास आहे, अशी शास्त्रीय धारणा आहे. त्यामुळेच या पवित्र ठिकाणीया जोडप्याने लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 26 जानेवारी रोजी सिद्धार्थ आणि पिनेलोपी विवाहबंधनात अडकणार आहेत. 

ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांच्या शिबिरात होणार विवाह गंगा-यमुना आणि सरस्वतीसह सर्व देवांना साक्षी मानून 26 जानेवारीला जुना आखाड्यातील ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांच्या शिबिरात वैदिक पद्धतीने विवाह होणार आहे. या सोहळ्याला अनेक साधू-संतांची उपस्थिती असणार आहे.

मैत्रीचे रुपांतर अचानक प्रेमात अथेन्स, ग्रीस येथील रहिवासी असलेल्या पिनेलोपीने सांगितले की, तिने पर्यटन व्यवस्थापनात पदवी घेतली आहे. यानंतर तिचा योगाकडे कल वाढला. पुढे तिने योगाचे शिक्षण घेतले आणि आपल्या देशात योग शिकवायला सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षांपूर्वी तिची आणि सिद्धार्थ खन्नाची दिल्लीत भेट झाली. सिद्धार्थदेखील योगा शिकवतो. त्यांच्यात सुरुवातीला मैत्री झाली आणि हळुहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. वर्षभरापूर्वी या दोघांनी जुना आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांची भेट घेतली. यानंतर पेनेलोपचा अध्यात्माकडे कल वाढला आणि तिने यांनी स्वामी यतींद्रानंद यांच्याकडून दीक्षा घेतली.

कुंभमेळ्यापूर्वीपिनेलोपीआणि सिद्धार्थ यांनी स्वामी यतींद्रानंद यांच्याकडे कुंभमेळ्यात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामींनीही त्यांना होकार दिला. आता 26 जानेवारीला या दोघांचा विवाह वैदिक रितीरिवाजांनुसार होणार आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टIndiaभारत