शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

'आमचे सरकार आल्यावर एका झटक्यात गरिबी हटवणार', राहुल गांधींचा मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:19 IST

Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींनी पीठ, डाळ, दूध, तेल, पेट्रोल, गॅसच्या किमती पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला.

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने दिली जातात. अशातच, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना एक मोठे आश्वासन दिले. गुरुवारी (11 एप्रिल, 2024) ईद-उल-फित्रच्या निमित्ताने, राहुल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमधून सरकारवर निशाणा साधला. 

या पोस्टमध्ये राहुल गांधींनी पीठ, डाळ, दूध, तेल, पेट्रोल, गॅस, डॉलरच्या जुन्या(काँग्रेस सरकारच्या काळातील) आणि आताच्या(मोदी सरकारच्या काळातील) किमती लिहिल्या. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले..

'महागाईत आणि बेरोजगारी, यामुळे सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसतोय. हेच आज देशासमोरचे दोन मोठे प्रश्न आहेत. प्रसारमाध्यमे हे लपवण्याचा प्रयत्न करताहेत. 'मोदी की बात' दाखवून महत्वाचा मुद्दा लपवला जातोय. भाजप सरकारचे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून हे केले जात आहे. नरेंद्र मोदी आपले 'रिपोर्ट कार्ड' देशापासून लपवत आहेत. आम्ही गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये, म्हणजेच दरमहा साडेआठ हजार रुपये देऊन गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढू. ही काँग्रेसची हमी आहे', असे राहुल यांनी या पोस्टमध्ये म्हटले.

एका झटक्यात गरिबी हटवू...राहुल गांधींनी या पोस्टसोबतच 56 सेकंदांची व्हिडिओ क्लिपही शेअर केली, ज्यामध्ये ते राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना दिसतात. 'देशातील सर्वात मोठा मुद्दा कोणता? 90 टक्के लोक म्हणतील बेरोजगारी आणि महागाई. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर, तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल, तर तुमच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये (दरमहा आठ हजार पाचशे रुपये) येत राहतील आणि एका झटक्याने भारतातून गरिबी हटवू,' असा दावा त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा