शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध शहरांच्या यादीत बंगळुरू, दिल्ली, मुंबईला स्थान; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:19 IST

यंदा पहिल्यांदाच जारी करण्यात आलेल्या निर्देशांकासाठी आर्थिक आणि सामाजिक समावेशकता हे निकष लावण्यात आले आहेत.

लंडन : जगातील ११३ देशांचा समावेश असलेल्या जागतिक समृद्ध निर्देशांकात भारताची सायबर सिटी बंगळुरूने ८३ वे स्थान पटकावले आहे. समृद्ध शहरांच्या यादीत बंगळुरूबरोबर दिल्लीमुंबई यांनाही स्थान मिळाले असले, तरी तिन्ही शहरे अतिशय मागेच आहेत.स्वित्झर्लंडचे झुरिक शहर या निर्देशांकात पहिल्या स्थानी आहे. यंदा पहिल्यांदाच जारी करण्यात आलेल्या निर्देशांकासाठी आर्थिक आणि सामाजिक समावेशकता हे निकष लावण्यात आले आहेत.या निर्देशांकात भारताची राजकीय राजधानी दिल्ली १०१व्या, तर आर्थिक राजधानी मुंबई १०७वे क्रमांकावर आहे. ‘प्रॉस्पेरिटी अँड इन्क्ल्युशन सिटी सील अँड अवॉर्डस् (पिकसा) इंडेक्स’ या नावाचा हा निर्देशांक उत्तर स्पेनमधील बिलबाव शहरात समारंभपूर्वक जारी करण्यात आला. शहराची आर्थिक वृद्धी आणि वृद्धीची लोकसंख्यात्मक समावेशकता हे प्रमुख निकष त्यासाठी लावण्यात आले आहेत. सर्वोच्च २० शहरांना ‘पिकसा सील’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बिलबाव शहराला निर्देशांकात २०वे स्थान मिळाले आहे.स्पेनमधील बिस्के शहराच्या विभागीय परिषदेचे ‘रणनीतिक कार्यक्रम’ संचालक एसिअर अ‍ॅलिया कास्टनोस यांनी नव्या निर्देशांकाबाबत माहिती देताना सांगितले की, पिकसा हा जगातील पहिला बिगर-व्यावसायिक मानांकन निर्देशांक आहे. जीडीपीच्या पलीकडे जाऊन आर्थिक उत्पादकतेचे मोजमाप तो करतो. अर्थव्यवस्थेत लोक किती चांगले जीवन जगत आहेत, कोणत्या लोकांना अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी व तिचे लाभ मिळण्यासाठी अधिक सबल केले जात आहे, याचे चित्र हा निर्देशांक जगासमोर सादर करतो. (वृत्तसंसंस्था)काय होते निकष?कास्टनोस यांनी सांगितले की, यशाचे मोजमाप आता नव्या निकषांवर करणे आवश्यक असल्याच्या मुद्द्याला सरकारी आणि खासगी क्षेत्रातही मान्यता मिळत आहे. अर्थव्यवस्थेतील उत्कर्ष वा समृद्धीचे मोजमाप करताना पारंपरिक रोजगार, कौशल्य आणि उत्पन्न या निकषाबरोबरच आरोग्य, घरांचा किफायतशीरपणा आणि जगण्याची गुणवत्ता हे निकषही लावले पाहिजेत, असे आता सर्वांनाच वाटू लागले आहे. नवा निर्देशांक नेमके हेच निकष लावून उत्कर्षाचे मोजमाप करत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईdelhiदिल्ली