शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

रोख व्यवहारांवर २ लाखांची मर्यादा

By admin | Updated: March 22, 2017 00:38 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पातील तरतुदीत सुधारणा करून रोखीच्या

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पातील तरतुदीत सुधारणा करून रोखीच्या व्यवहारांवर तीन लाखांऐवजी दोन लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा नवा प्रस्ताव सरकारने लोकसभेत मांडला आहे.अर्थसंकल्पासोबत मांडलेल्या मूळ वित्त विधेयकात निरनिराळ््या प्रकारच्या तब्बल ४० दुरुस्त्या प्रस्तावित करणारे विधेयक जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत मांडले. विरोधकांनी अशा प्रकारे विविध दुरुस्त्यांची मोट बांधून एकच सुधारणा विधेयक मांडणयास विरोध केला. मात्र, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधकांनी उपस्थित केलेले तांत्रिक आक्षेप अमान्य केले आणि वित्तमंत्र्यांनी सुधारित वित्त विधेयक मांडण्यास अनुमती दिली.या ४० दुरुस्त्यांपैकी एक दुरुस्ती रोखीच्या व्यवहारांवर कमाल मर्यादा घालण्याशी संबंधित आहे. मूळ वित्त विधेयकात ही मर्यादा तीन लाख रुपयांची प्रस्तावित करण्यात आली होती. आता ही दोन लाख रुपयांची करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारित मर्यादेचा भंग करून जेवढ्या जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार केला जाईल, तेवढाच दंड आकारण्याची तरतूद यात आहे, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी टिष्ट्वट करून स्पष्ट केले.हे सुधारित वित्त विधेयक संसदेत मंजूर झाल्यावर, रोखीच्या व्यवहारांवरील दोन लाख रुपयांची कमाल मर्यादा येत्या १ एप्रिलपासून लागू होईल.या ४० दुरुस्त्यांमध्ये कंपनी कायदा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा, परकीय चलन नियमन कायदा, ‘ट्राय’ कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा अशा विविध कायद्यांमध्येही काही सुधारणा करण्याची तरतूद आहे. याचा वित्त विधेयकाशी काही संबंध नाही. या दुरुस्त्याही वित्त विधेयकात घुसडून सरकार त्या ‘मनी बिल’ म्हणून मागच्या दरवाज्याने मंजूर करून घेऊ पाहात आहे, असा आक्षेप तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल व क्रांतिकारी समाजवादी पक्ष यासारख्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)