शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

...हा भाषा लादण्याचाच डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:41 IST

हिंदी भाषा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक भाषा, एक राष्ट्र’ हा विचार बोलून दाखवला आणि देशात चर्चेचे मोहोळ उठले.

- पद्मश्री प्रो. गणेश देवी, ज्येष्ठ विचारवंत, भाषातज्ज्ञ.हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा अजिबात नाही. राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्टात सध्या ज्या २२ भाषांचा समावेश आहे, त्यापैकी हिंदी एक आहे. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी घटना समिती स्थापन करण्यात आली होती, तिच्या जवळपास प्रत्येक बैठकीत भाषांवर चर्चा झाली. त्यांनी १४ भाषांचा त्यात समावेश केला. काही काळाने आणखी ८ भाषांचा समावेश झाला. त्यात तामिळ, तेलगू, मराठी, बंगाली आदींबरोबर हिंदीही होती. तिला विशेष दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे हिंदीला देशाची भाषा बनवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला विरोध करायला हवा. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाही युरोपीय देशांप्रमाणे ‘एक देश, एक भाषा’ हे सूत्र राज्यकर्त्यांनी स्वीकारले नव्हते. भारतात असंख्य भाषा असल्याने ते स्वीकारता येणार नाही, हे त्यांना माहीत होते. पण आता ‘हिंदी, हिंदू व हिंदुस्थान’ असा भाजपचा अजेंडा आहे.बहुमताच्या आधारे संपूर्ण देशावर हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशात हिंदी भाषिकांचे बहुमत आहे, हे म्हणणेच चुकीचे आहे. देशातील बहुसंख्य लोक हिंदी बोलतात, हे खरे नाही. २०११ रोजीच्या जनगणनेनुसार १२१ कोटींपैकी ३५ कोटी (सुमारे २५ टक्के) लोकच हिंदी बोलत होते. त्यातही भोजपुरीसह ६३ उप वा बोलीभाषांचा समावेश होता. म्हणजे ७५ टक्के लोक हिंदी न बोलणारे आहेत. तरीही हिंदीला राष्ट्रभाषा, देशाची भाषा करण्याचा प्रयत्न कशासाठी? देशात लहान-मोठ्या अशा तब्बल १,३६८ भाषा आहेत. त्या सर्व भाषिकांनी हिंदीच बोलावी, हा हट्ट कशासाठी? हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हाही आंदोलने झाली, दंगली झाल्या, रक्तपात झाला. पंजाब, तेलंगणा (आंध्र) तामिळनाडू यांची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. म्हणजेच हिंदी लादण्याचा प्रयत्न अनेक राज्यांना मान्य नव्हता आणि नाही.पाकिस्तानपासून वेगळे होण्याची भाषा पूर्व पाकिस्तानात (आजचा बांग्लादेश) होण्यामागे उर्दू भाषेची जबरदस्ती हेही कारण होते. १९७२ रोजी इंदिरा गांधी यांनी इंग्रजी- हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचाही राज्यकारभारास वापरास संमती दिली. म्हणजेच प्रादेशिक भाषेचे महत्त्व त्यांनी कायम ठेवले.आर्य विरुद्ध द्रविड हा वाद जुनाच आहे. हिंदी ही आर्यांची भाषा मानली गेली. त्यामुळे द्रविडी भाषा व संस्कृती जपणारे हिंदी लादण्यास विरोध करीत आले आहेत. या दक्षिणेकडील राज्यांच्या सत्तेची मनिषा भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे असे मुद्दामच शॉक देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सततच्या शॉक वा धक्क्यांची हळुहळू सवय होते. ती दक्षिणेकडील राज्यांना होईल आणि त्यातून आपल्याला तिथे पाय पसरता येईल, असे या नेत्यांना वाटत आहे. अमित शहा यांच्या नावातील शहा हे नाव मुळात पर्शियन आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. भाषेतील शब्दांचे सर्क्युलेशन सतत होत असते. लोक अनेकदा व्यवहार म्हणून अन्य भाषा स्वीकारतात. महाराष्ट्रात राहणारे गुजराती, मारवाडी वा काही वेळा उत्तर व दक्षिण भारतीय यांनी मराठी स्वीकारली आहे, तर दक्षिणेकडील लोक हिंदी भाषित राज्यांत जातात, तेव्हा हिंदी शिकतात. त्याला जोडभाषा वा लिंक लँग्वेज म्हणता येईल. पण त्यासाठी भाषा लादणे चुकीचे आहे. भाषेचा अर्थकारणाशीही संबंध आहे. आज अनेक घरातील भाषा वेगळी, तर मुलांची शाळेतील भाषा वेगळी असते. त्यासाठी आधीच पालकांना अधिक खर्च येतो. त्यात आणखी हिंदी लादली, तर त्याचा पालकांच्या अर्थकारणावरही परिणाम होईल, हेही विचारात घ्यायला हवे.देशात भाषा हा विषय मुळात गृह मंत्रालयाकडे का सोपवला आहे, हे कळण्यास मार्ग नाही. असे जगातील एकाही देशात पाहायला मिळणार नाही. त्यामुळेच गृहमंत्र्यांनी हिंदीविषयक वक्तव्य करणे हा ती भाषा लादण्याचाच भाग आहे, असे दिसते.अमित शहा यांच्या नावातील शहा हे नाव मुळात पर्शियन आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. भाषेतील शब्दांचे सर्क्युलेशन सतत होत असते. लोक अनेकदा व्यवहार म्हणून अन्य भाषा स्वीकारतात. दक्षिणेकडील लोक हिंदी भाषित राज्यांत जातात, तेव्हा हिंदी शिकतात. त्याला जोडभाषा वा लिंक लँग्वेज म्हणता येईल. पण त्यासाठी भाषा लादणे चुकीचे आहे.