शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 08:55 IST

BHU News In Marathi: बनारस हिंदू विद्यापीठात काल रात्री विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला.

बनारस हिंदू विद्यापीठात काल रात्री विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. राजाराम वसतिगृहाजवळ सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. यात अनेक विद्यार्थी, सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

राजाराम वसतिगृहाबाहेर काही विद्यार्थी एका विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याची माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळाली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि परिसरातील फॅक्टोरियल बोर्ड काढून घेतला. या कारवाईमुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी वसतिगृहाबाहेर निदर्शने सुरू केली. यानंतर, राजाराम वसतिगृहाबाहेर एका विद्यार्थ्याला वाहनाने धडक दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला आणि त्यांनी थेट कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर धाव घेऊन जोरदार निदर्शने सुरू केली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या झटापटीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 'सौम्य बळाचा' वापर करताच, संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक सुरू केली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये तोडफोड केली. त्यांनी एलडी गेस्ट हाऊसजवळील फुलांच्या कुंड्या फोडल्या, तसेच काशी तमिळ संगमशी संबंधित अनेक खुर्च्या आणि पोस्टर्सचीही नासधूस केली. परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे पाहून पोलिसांना बोलवण्यात आले.

एसीपी भेलुपूर गौरव कुमार यांनी सांगितले की, "बीएचयूमध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. परिस्थिती चिघळताना पाहून मुख्य प्रॉक्टर यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही समस्या नाही. हा कॅम्पसमधील अंतर्गत वाद आहे आणि त्याबद्दल केवळ प्रॉक्टरच माहिती देऊ शकतील. सध्या विद्यापीठाच्या परिसरात शांतता असून परिस्थिती सामान्य आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts at BHU: Students, Security Clash; Stone Pelting Reported

Web Summary : A violent clash erupted at Banaras Hindu University between students and security. The incident escalated after security intervened in a student altercation. Stone pelting ensued, causing injuries and property damage. Police were called to restore order; the situation is now under control.
टॅग्स :BHUबनारस हिंदू विश्वविद्यालयVaranasiवाराणसीStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण