शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

चीनच्या सीमेवर लष्कर, हवाईदलाचा धडाकेबाज युद्ध सराव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:24 PM

भारतीय सैन्याच्या जवानांनी मंगळवारी पूर्व लढाखमध्ये एका मोठा युद्धसराव केला.

लेह (लडाख) - भारतीय सैन्याच्या जवानांनी मंगळवारी पूर्व लढाखमध्ये एका मोठा युद्धसराव केला. या युद्धसरावामध्ये हवाई दल आणि लष्कराच्या अनेक तुकड्यांमधील जवान सहभागी झाले होते. येथून चीनची सीमा जवळच असल्याने रणनीतिक पातळीवर हा युद्धसराव खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  लडाखमधील या भागात भारतीय सैन्यातील जवानांनी कुठल्याही प्रकारचा युद्ध सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष बाब म्हणजे लष्कराच्या नॉर्दन कमांडचे लेफ्टिनंट जनरल रणबीर सिंह हे सुद्धा या युद्धसरावासाठी उपस्थित होते. दरम्यान, नॉर्दन कमांडकडून या युद्धसरावाची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत. 

 लडाखच्या काही भागामध्ये चिनी सैन्याकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे अनेकदा भारत आणि चीनचे सैनिक याभाहात आमनेसामने येतात. अशा परिस्थितीत भारतीय जवानांनी हा युद्धसराव करून चीनला कठोर संदेश दिला आहेत. या युद्धसरावासाठी भारतीय जवानांनी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा शस्रास्रांचा वापर केला होता. 

 हल्ली काही दिवसांपूर्वीच लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्याचे जवान आमने-सामने आले होते. लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर या परिसरातील परिस्थिती निवळली होती. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असून दोन्ही देशांमध्ये अजूनही सीमावाद सुरू आहे. मात्र या वादाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नसून दोन्ही देश चर्चा सुरू ठेवतील, असे दोन्ही देशांकडून सांगितले जाते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलladakhलडाखIndiaभारत