शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सरदारजींवरील ‘जोक्स’; ५ एप्रिलला सुनावणी

By admin | Updated: March 18, 2016 02:03 IST

शीख समुदायांसंबंधी विनोद किंवा चुटकुल्यांच्या (जोक्स)प्रसारावर निर्बंध आणण्याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (शिगुप्रस) याचिकेसह अन्य याचिकांवर ५ एप्रिल

नवी दिल्ली : शीख समुदायांसंबंधी विनोद किंवा चुटकुल्यांच्या (जोक्स)प्रसारावर निर्बंध आणण्याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (शिगुप्रस) याचिकेसह अन्य याचिकांवर ५ एप्रिल रोजी सुनावणी करण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविलीआहे. अशा चुटकुल्यांचा व्यापारदृष्ट्या वापर केला जात असेल तर कारवाई केली जाऊ शकते, असेही सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अ‍ॅड. सतिंदरसिंग गुलाटी यांनी ज्याबाबत उपन्यायिक आदेश दिला जाऊ शकतो, असे भाग निश्चित करावे असेही खंडपीठाने म्हटले.अशा विनोदातून टर उडविली जात असल्याने संपूर्ण शीख समुदायामध्ये छळवणूक होत असल्याची भावना निर्माण असेल तर आम्ही निश्चितच काही मुद्यांकडे लक्ष देऊ शकतो. विशिष्ट भाषा आणि धर्मामुळे शिखांबाबत भेदभाव केला जात असून एक रुढीवादी धारणा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन गुलाटी यांनी न्यायालयात केले. (वृत्तसंस्था)‘त्या’ वेबसाईटवर निर्बंध घालण्याबाबतही होणार विचार..- दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने(डीएसजीएमसी) दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा विनोदांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावू शकतात, हे लक्षात घेत, समाजाने संवेदनशील होण्याची गरज आहे. विनोदाचा प्रसार व्यापारदृष्ट्या केला जात असेल तर ते रोखले जाऊ शकतात.- सायबर जगतात जातीयवादी किंवा सांप्रदायिक चुटकुल्यांचा प्रसार रोखण्यासंबंधी समितीने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यास त्याबाबत समीक्षा केली जाईल. अशा विनोदाचा आनंद घेणारे लोक कमी असले तरी त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर प्रभाव पडतो, असे महिला वकील हरविंदर चौधरी यांनी एका जनहित याचिकेत म्हटले होते.