शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आता कसा पूर्ण करायचा लडाखमधला रस्ता?; झारखंडचा मोदी सरकारला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:51 IST

चीनच्या सीमावर्ती भागात रस्ता तयार करण्याच्या कामात आता वेगळीच अडचण

दुमका: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झारखंड सरकारनं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला (बीआरओ) दिलेली परवानगी नाकारली आहे. लडाखमधील रस्त्याच्या कामासाठी दुमका भागात कामगारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात यावी, यासाठी झारखंडमधल्या हेमंत सोरेन सरकारनं परवानगी दिली होती. मात्र आता ही परवानगी मागे घेण्यात आल्यानं लडाख भागातील रस्ता पूर्ण कसा करायचा, असा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महानगरांमध्ये कामासाठी गेलेले झारखंडमधले अनेक मजूर घरी परतले आहेत. त्यांच्या मदतीनं लडाखमधल्या रस्त्याचं काम करण्याचा मोदी सरकारचा मानस होता. यासाठी सोरेन सरकारनं सीमावर्ती भागातील रस्ते बांधणीचं काम करणाऱ्या बीआरओ आणि केंद्रीय दलांना मंजुरीदेखील दिली होती. गेल्याच महिन्यात सोरेन सरकारनं परवानगी दिल्यानंतर बीआरओनं मजुरांची निवड प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली. मात्र आता सोरेन सरकारनं बीआरओचे संचालक (नियोजन) सौरभ भटनागर यांना परवानगी रद्द करत असल्याचं पत्र पाठवलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.सोरेन सरकारनं बीआरओच्या संचालकांना २९ मे रोजी लिहिलेल्या पत्रात कोरोना संक्रमणाची भीती आणि लॉकडाऊनचा उल्लेख आहे. 'कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन वाढण्याची शक्यता पाहता आम्ही तुम्हाला देत असलेली परवानगी तातडीनं रद्द करत आहोत,' असं झारखंड सरकारनं पत्रात म्हटलं आहे. लडाख भागात चीनला लागून असलेल्या भागात रस्ता तयार करण्यासाठी ११ हजार मजुरांची आवश्यकता आहे.लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाख