शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 09:37 IST

जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर केला गोळीबार

ठळक मुद्देजम्मू आणि काश्मीर खोरे यांना जोडणाऱ्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला म्मू-श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ आज पहाटे उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान चकमक उडाल्यानंतर  खबरदारीचा उपाय म्हणून  जम्मू श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती

श्रीनगर -  जम्मू आणि काश्मीर खोरे यांना जोडणाऱ्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे.  जम्मू-श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ आज पहाटे उडालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आहे. तर अन्य दहशतवादी आसपासच्या परिसरात लपून बसले होते. या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी  सुरक्षा दलांनी परिसराचा ताबा घेत शोधमोहीम सुरू केली होती. अखेरीस या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात आले. 

या चकमकीबाबत अधिक माहिती देताना जम्मूचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, आज पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी एक ट्रक तपासणीसाठी थांबवला. त्यावेळी  आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. 

पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा

कुख्यात दहशतवादी ‘बॉम्ब’ला कानपूरमधून अटक; पॅरोल रजेदरम्यान मुंबईतून झाला होता फरार

जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले दरम्यान, ही चकमक उडाल्यानंतर  खबरदारीचा उपाय म्हणून  जम्मू श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. तसेच बान टोल प्लाझा जवळ दोन स्पोट झाल्याचा आवाजही ऐकण्यास आला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान