terrorists fired on police at Bann toll plaza, One policeman injured, one terrorist killed | जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले 

जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले 

 श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत 1 दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. चकमक अद्याप सुरू आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आहे. 

दरम्यान, ही चकमक उडाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराचा ताबा घेत शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून  जम्मू श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.  तसेच मार्गावरील वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. 

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जम्मू -श्रीनगर महामार्गावरील बान टोल प्लाझा येथे एका ट्रकला अडवल्यानंतर त्या ट्रकमधील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली. दरम्यान, बान टोल प्लाझा जवळ दोन स्पोट झाल्याचा आवाजही ऐकण्यास आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोल प्लाझाजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना गुंगारा देण्यासाठी दहशतवाद्याने लष्करी गणवेशासारखी वेशभूषा केली होती. 

Web Title: terrorists fired on police at Bann toll plaza, One policeman injured, one terrorist killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.