शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक आमनेसामने; धक्काबुक्कीमुळे तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 08:55 IST

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर दोन्ही देशाचे सैनिक भिडले

नवी दिल्ली: एका बाजूला पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला असताना आता दुसऱ्या बाजूला चीनच्या सीमावर्ती भागात भारत-चीनचे सैनिक आमनेसामने आले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बुधवारी बराच काळ धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. या भागातील भारतीय जवानांच्या उपस्थितीचा चिनी सैन्यानं विरोध केला. यानंतर दोन्ही देशाचे जवान एकमेकांना भिडले. त्यांच्यात काही वेळ धक्काबुक्की झाली. यानंतर या भागातील लष्कराची कुमक वाढवण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्यांमधील संघर्ष सुरू होता. दोन्ही सैन्यांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. त्यासाठी द्विपक्षीय व्यवस्थेअंतर्गत ब्रिगेडियर पदावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. 'लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवरुन (एलएसी) दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांचं सैन्य वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकतं. असा तणाव बॉर्डर पर्सनल मीटिंग आणि फ्लॅग मीटिंगच्या माध्यमातून सोडवला जातो,' असंदेखील अधिकाऱ्यानं सांगितलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाख