शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 08:14 IST

ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते.

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने LAC वर चीनचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, त्या परिसरातील सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.

ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

चिनी सैनिक भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी १५ दिवसांपासून तयारी करत होते. सोमवारी त्यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार १७ हजार फूट उंचीवर पोहचले. मात्र चिनी सैनिकांना पाहताच आधीच तयारीत असलेल्या भारतीय जवानांनी सतर्कता बाळगली. त्यानंतर झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. 

भारतीय लष्कराकडून निवेदन जारीया घटनेबाबत भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटलंय की, आम्ही चीनचा डाव हाणून पाडला. अरुणाचल प्रदेशात LAC च्या नजीक काही भाग आहेत ज्याठिकाणी सर्व क्षेत्रे येतात. इथे दोन्ही देशांमधला समज वेगळा आहे. दोन्ही देश आपापल्या बाजूने हक्काच्या रेषेपर्यंत गस्त घालतात. हा २००६ पासून ट्रेंड करत आहे. ९ डिसेंबर २०२२ रोजी, चीनी सैन्याने LAC सेक्टरमध्ये पुढे सरकले. ज्याचा आमच्या सैन्याने मोठ्या जोमाने आणि ताकदीने सामना केला. नंतर, दोन्ही देशांचे सैनिक तेथून माघारले, पाठपुरावा म्हणून, भारत आणि चिनी कमांडर्समध्ये फ्लॅग मिटिंग झाली आणि चर्चा केली. या बैठकीत शांततेवर चर्चा झाली. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान