शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये बड्या नेत्याने खेळली शिंदेंसारखी खेळी, आमदारांना घेऊन दिल्लीला रवाना, आसामला जाण्याचीही चर्चा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:48 IST

Jharkhand Political Crisis: इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखी राजकीय  परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन (Champai Soren) हे यांच्याबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांदरम्यान दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखी राजकीय  परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे यांच्याबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांदरम्यान दिल्लीकडे रवाना झाले आहेत. चंपई सोरेन हे भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांच्या सातत्याने संपर्कात असून, सोरेन यांच्यासोबत सहा आमदारही दिल्लीला येत असल्याचा दावा केला जात आहे. 

चंपई सोरेन यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाचा संपर्क प्रस्थापित होत नाही आहे. दरम्यान, हे सर्व आमदार भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्या आमदारांसोबत संपर्क प्रस्थापित होण्यात अडथळे येत आहेत. त्यांच्यामध्ये दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन होमब्रोम, समीर मोहमंती यांचा समावेश आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंपई सोरेन काल रात्री कोलकातामधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे त्यांनी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली होती. आज पहाटे खासगी कर्मचाऱ्यांसह ते विमानातून रवाना झाले. दरम्यान, ते दिल्लीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिथे ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंपई सोरेन हे आसामला जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजपाचे झारखंडमधील प्रभारी आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर ते सहकाऱ्यांसह आसामला गेले होते.  

दरम्यान, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. मात्र हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी चंपई सोरेन यांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतले होते. तेव्हापासून चंपई सोरेन नाराज असल्याची चर्चा होती.   

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा