शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

देशावर एक भाषा लादणे अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:43 IST

- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य) ‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. ...

- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य)‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. तर शास्त्रीय कारण आहेत. भाषा हे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. एखाद्या भागातला निसर्ग, व्यवसाय, भूभागाचे हवामान, पीक, जीवनपद्धती, कला कौशल्य यांच्याशी निगडित भाषा असते. महाराष्ट्रात भाषा शेतीशी जोडलेली आहे. भारतात विविध भौगोलिक भाषा आहेत. त्यामुळे भारतात ‘एक भाषा’ होऊ शकत नाही.भाषेला गुणात्मक निकष लावला पाहिजे. हिंदी वगळता सर्व भारतीयांना ४०० वर्षांहून अधिक इतिहास आहे. त्यामुळे हिंदी भाषा लादणे योग्य नाही. भारतातील एकूण ४९ भाषा एकत्र करून हिंदी भाषा निर्माण झाली आहे. त्यामुळे ती कृत्रिम भाषा आहे. देशात एकूण ६,७०० बोलीभाषा आहेत. तर जगात २१ हजार भाषा आहेत. जगात एकाही लोकशाही देशाला राष्ट्रभाषा नाही. १३ देशांनाच राष्ट्रभाषा आहे. १९० देशांना नाही. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या लोकशाही देशांनी राष्ट्रभाषा ठरवलेली नाही. भाषा ठरवली गेली तर देशाचे तुकडे पडतात. भाषेमुळे तुकडे पडल्याने देशांची नावे भाषेवरून ठेवली गेली. पाकिस्तानने राष्ट्रभाषा ठरवण्याचा आगाऊपणा केल्याने पाकिस्तानचे तुकडे पडले. जिनांनी राष्ट्र निर्माण केले म्हणून त्यांच्या आग्रहाखातर उर्दू ही राष्ट्रभाषा ठरवण्यात आली. मात्र १९७१ लाच पाकिस्तानचा पहिला तुकडा पडला. बांग्लादेश बांग्लाभाषेमुळे वेगळा झाला. भारताने ‘एक देश, एक भाषा’ असे सूत्र स्वीकारल्यास देशाचे १६ तुकडे पडतील. पाकिस्तानसारखे दुर्दैव आपल्याकडे होऊ नये. त्यामुळे भारतीय व्यक्तीने ‘एक देश, बहू भाषा’ असा विचार करावा.