शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

एका लसीचे तीन दर, संकटकाळात नफेखोरीला केंद्राकडून मान्यता कशी?; सोनिया गांधींचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 14:34 IST

Coronavirus Vaccine : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं होणार लसीकरण, यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केले होते लसींचे दर

ठळक मुद्दे१ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं होणार लसीकरण यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केले होते लसींचे दर

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनंही मोठं पाऊल उचलत १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लस उत्पादक कंपन्यांना राज्यांना आणि खुल्या बाजारात एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं राज्य सरकारांसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु यानंतर या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तसंच केंद्र सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'सध्या देशात रुग्णालयांमध्ये बेड्स, औषधं आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. अशावेळी सरकार अशाप्रकारच्या नफेखोरीला कशी मान्यता देऊन शकतं. सीरम इन्स्टिट्यूटनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठी निरनिराळे दर निश्चित केले आहे. याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होणार आहे,' असं त्यांनी पत्रात नमूद केलं. 'राज्य सरकारांवरील संकट वाढेल आणि सामान्य लोकांना लसीकरणासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत एकच लस उत्पादक कंपनी तीन प्रकारचे दर कसे निश्चित करू शकते,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला आपलं हे धोरण त्वरित मागे घ्यायला हवं, जेणेकरून १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेता येईल, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. १ मे पासून व्यापक लसीकरण मोहीम १ मेपासून देशात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. तसंच १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसी लोकांना देण्यात येत आहेत. केंद्रानं काही दिवसांपूर्वी रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापरासही मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती लसदेखील बाजारात उपलब्ध होणार आहे. काँग्रेसच्या व्यतिरिक्त अन्य काही पक्षांनीही लसीच्या निरनिराळ्या दरावर टीका केली आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत