शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 17:50 IST

अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या झेड श्रेणीच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे. राज्यपाल होण्यापूर्वी थावरचंद गेहलोत मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. दरम्यान, केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढकेंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. चिराग पासवान (४१) हे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री तसेच लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष आहेत. चिराग पासवान यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान असे संबोधले होते.

चिराग पासवान यांना झेड श्रेणीची सुरक्षाआतापर्यंत चिराग पासवान यांच्या सुरक्षेखाली केंद्रीय निमलष्करी दल सशस्त्र सीमा बल (SSB) ची एक छोटी तुकडी तैनात करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) व्हीआयपींची सुरक्षा करणाऱ्या युनिटला चिराग पासवान यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असणारअनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्याशिवाय इतर केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांचा समावेश आहे.

झेड श्रेणीत २२ ते २४ जवानांचा ताफ्यात समावेश असेलदरम्यान, व्हीआयपी सुरक्षा कवच श्रेणींमध्ये झेड प्लस ही सर्वोच्च मानली जातो. यानंतर 'झेड', 'वाय प्लस' आणि 'एक्स' श्रेणीची सुरक्षा येते. २२ ते २४ सुरक्षा कर्मचारी झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात आहेत, ज्यात शार्पशूटर आणि प्रशिक्षित कमांडो यांचा समावेश आहे. 

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानIndiaभारत