शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:06 IST

Operation Sindoor Video : 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे. 

पहालगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळं उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. यानंतर संपूर्ण पाकिस्तानात हाहाकार माजला आहे. तर, भारतात मात्र आज समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे. आया-बहि‍णींचं कुंकू पुसणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. आता 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे. 

मंगळवारी रात्री १:०५ वाजता पाकिस्तान आणि पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय सैन्याने हल्लाबोल केला. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात अराजकता पसरली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या  ९ अड्ड्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये ९० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने केलेली ही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आणि त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.

समोर आला व्हिडीओ!

बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास भारतीय लष्कराने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराचे जवान लष्कर-ए-तोयबाचे अड्डे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सुमारे ३४ सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील कोटली येथील अब्बास दहशतवादी छावणीचा आहे. ही छावणी भारतीय नियंत्रण रेषेपासून (POJK) १३ किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराच्या माहितीनुसार, ही छावणी लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे ५० हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.

व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये उडाला गोंधळ! 

मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये लोक घाबरले आहेत. भारतीय लष्कराने या कारवाईचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. तिथल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक