शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींनीही कंबर कसली!

By admin | Updated: September 22, 2014 09:48 IST

निवडणुकीसाठी प्रत्येकच जण लगिनघाईत असताना घरोघरीच्या गृहिणी मागे कशा राहतील? त्यामुळेच आता उमेदवारांनी गृहिणींना 'टार्गेट' केले

मुंबई : निवडणुकीसाठी प्रत्येकच जण लगिनघाईत असताना घरोघरीच्या गृहिणी मागे कशा राहतील? त्यामुळेच आता उमेदवारांनी गृहिणींना 'टार्गेट' केले असून, त्यांना प्रचारासाठी विविध पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे. 'गॉसिपिंग'मध्ये आघाडीवर असणार्‍या गृहिणी वर्गाच्या माध्यमातून काना-कानात प्रचाराचा आवाज घुमेल याची काळजी राजकीय पक्ष घेत आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठीही गृहिणीही कंबर कसत असून दुपारच्या रिकाम्या वेळात राजकीय पक्षांसाठी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जोमाने काम करत आहेत.चाकरमानी, तरुणपिढीसोबत आता गृहिणींनीही प्रचारकामात उडी घेतल्याने विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी गृहिणींना मोफत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यात संगणक प्रशिक्षण, सोशल नेटवर्किंग साइ्टस हाताळणे, बल्क मेसेजिंग आणि माऊथ पब्लिसिटीचा समावेश आहे. घरकामे आवरल्यानंतर दुपारच्या वेळेत गृहिणींसाठी या विशेष वर्गांचे आयोजन केले जात आहे. घराघरांतील गृहिणींमध्ये 'तुमच्याकडे भाजी कोणती?', 'आज बाजारात येणार का?' याऐवजी गृहिणींमध्ये जागावाटपाचा तिढा, उमेदवारांवर टिका-टिप्पणी आणि आघाडीत बिघाडी यावर चर्चा रंगताना दिसत आहे. या चर्चेमुळे घराघरात राजकीय रंग चढला असून, एकूणच निवडणुकीचीच चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात 'चूल आणि मूल' याचे बंधन झुगारून आता गृहिणीही प्रचारसभा, रॅली आणि पदयात्रांमध्येही आघाडीवर असतील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)