शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:38 IST

एका भीषण अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सेक्टर-१५० मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेल्या खोल पाण्यात कार कोसळल्याने युवराज मेहता या तरुणाचा वेदनादायक अंत झाला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यात रस्त्याच्या कडेला ना रिफ्लेक्टर होते, ना कोणताही इशारा देणारा बोर्ड. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्राधिकरणाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. रात्री उशिरा तो ऑफिसवरून घरी परतत असताना धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेला नाला किंवा रिकाम्या प्लॉटचा अंदाज न आल्याने त्यांची कार घसरली आणि नाल्याची भिंत तोडून थेट पाण्याने भरलेल्या खोल प्लॉटमध्ये जाऊन पडली.

वडिलांना केलेला तो शेवटचा फोन 

थंड पाण्यात कार अडकल्यानंतर युवराजने आपले वडील राजकुमार मेहता यांना फोन केला आणि व्याकुळ होऊन म्हणाला, "बाबा, मी पाण्यात पडलो आहे, खूप थंडी वाजतेय, मला वाचवा, लवकर या..." यानंतर तो मदतीसाठी सतत ओरडत होता, पण दुर्दैवाने वेळेत कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. जवळून जाणाऱ्या काही प्रवाशांनी आवाज ऐकला, पण खोल पाणी असल्याने कोणीही हिम्मत दाखवली नाही आणि केवळ फोन करत राहिले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत युवराजचा मृत्यू झाला.

प्राधिकरणाविरोधात संताप 

स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षेचा अभाव होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर किंवा धोक्याचे फलक लावलेले नव्हते. अपघाताची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्राधिकरणाविरोधात जोरदार निदर्शने केली. "येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, पण वारंवार तक्रार करूनही ठोस पाऊल उचललं गेलं नाही" असा आरोप नागरिकांनी केला.

७० फूट खोल प्लॉट तातडीने भरला 

नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि प्राधिकरणाला जाग आली. त्यांनी तातडीने तो ७० फूट खोल प्लॉट राडारोडा आणि कचरा टाकून भरून घेतला. मात्र, मृत युवराजच्या वडिलांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, "आता हे करून काय उपयोग? जर प्राधिकरणाने वेळीच सुरक्षेचे उपाय केले असते, तर आज माझा मुलगा जिवंत असता."

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस