शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या खोलीवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली पाच मजली इमारत, एका मुलीचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:36 IST

Building Collapse In Delhi: राजधानी दिल्लीमधील बुराडी परिसरात बांधकाम सुरू असलेली एक इमारक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बुराडी परिसरात असलेल्या कौशिक एन्क्लेव्ह ऑस्कर स्कूलजवळ बांधकाम सुरू असलेली ही पाच मजली इमारत अचानक कोसळली.

राजधानी दिल्लीमधील बुराडी परिसरात बांधकाम सुरू असलेली एक इमारक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. बुराडी परिसरात असलेल्या कौशिक एन्क्लेव्ह ऑस्कर स्कूलजवळ बांधकाम सुरू असलेली ही पाच मजली इमारत अचानक कोसळली. त्यात एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. तसेच आणखी आठ जण ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मागच्या वर्षभरापासून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. या इमारतीच्या फिनिशिंगचं काम सुरू असल्याने इथे काम करणारे कामगार इमारतीजवळच एका खोलीत राहत होते. जेव्हा ही इमारत कोसळली, तेव्हा ढिगारा या कामगारांच्या खोल्यांवर कोसळला.

इमातर कोसळली तेव्हा सुमारे २० ते २२२ जण इथे राहत होते. हे सर्वजण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताचा आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्य सुरू करून १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ३ पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. तसेच त्यांना उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

या दुर्घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांसह स्थानिक आमदार आणि खासदार आदि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाचा दौरा केला. तसेच या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच या प्रकरणात कोण दोषी आहे आणि कुणाच्या बेफिकीरीमुळे ही दुर्घटना झाली आहे, याचा तपास करून जे दोषी असतील त्यांच्यावरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीBuilding Collapseइमारत दुर्घटनाAccidentअपघात