शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:07 IST

Kurnool bus accident: आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे नुकत्याच झालेल्या एका भीषण बस अपघातात २० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे नुकत्याच झालेल्या एका भीषण बस अपघातात २० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. मद्यपान करून गाडी चालवणारे लोक हे दहशतवादीच असतात, तसेच त्यांची रस्त्यावरील वर्तणूक ही दहशतीपेक्षा कमी नसते, असे सज्जनार यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुरनूल येथे झालेला बस अपघात हा साधासुधा अपघात नव्हता, तर एका मद्यधुंद दुचाकीस्वाराची बेफिकीरी आणि असंवेदनशीलतेमुळे घडलेली दुर्घटना होती. ही दुर्घटना टाळता आली असती.

हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार पुढे म्हणाले की, अपघात झाला तेव्हा दुचाकीस्वार बी. शिवशंकर हा मद्यधुंद अवस्थेत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्यानुसार त्याने रात्री २ वाजून २४ मिनिटांनी त्याच्याकडील दुचाकी पेट्रोल भरले होते. त्यानंतर काही मिनिटांतच  २ वाजून ३९ मिनिटांनी त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची दुचाकी प्रवासी बसवर आदळून मोठा अपघात झाला.

सज्जनार यांनी पुढे सांगितले की, शिवशंकर याच्या मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवण्याच्या अहंकारामुळे एक भीषण दुर्घटना घडली. त्यामुळे मद्यपान करून दुचाकी चालवणारे लोक हे दहशतवादीच असतात, या माझ्या विधानावर मी ठाम आहे. हे लोक जीवन, कुटुंब आणि भविष्य बरबाद करतात. अशी कृत्य करणाऱ्यांना कधीही सहन केलं जाणार नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, हैदराबादमध्ये मद्यपान करून दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात झीरो टॉलरन्स धोरण लागू करण्यात आलं आहे. जी व्यक्ती मद्यपान करून वाहन चालवताना पकडली जाईल, त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या यात कुठलीही सवलत दिली जाणार नाही, असेही सज्जनार यांनी सांगितले. तसेच मद्यपान करून वाहन चालवणे ही चूक नाही तर गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्यासाठी शिक्षा अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk drivers are terrorists: Hyderabad Police Commissioner on Kurnool bus accident.

Web Summary : Hyderabad's Police Commissioner stated drunk drivers are terrorists after a fatal bus accident in Kurnool caused by a drunk motorcyclist. Zero tolerance for drunk driving will be enforced in Hyderabad, with strict penalties.
टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हAccidentअपघातPoliceपोलिसterroristदहशतवादी