शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू; हिंसाचार करणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळी घालण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:54 IST

ईशान्य दिल्लीत संचारबंदी; दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

नवी दिल्ली : दोन महिन्यांपासून शांततेने सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनास देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात एका पोलिसासह १३ जणांचा बळी घेतला आहे. शिवाय ६७ पोलिसांसह १५० हून अधिक दिल्लीकर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.

भजनपुरा आणि खजुरी खसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलिसांनी या भागात संचलन केले. दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना सीआरपीएफमधून माघारी बोलावून दिल्लीचे
विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) म्हणून तत्काळ नियुक्त केले. दिल्ली पोलिसांनी रात्रीपर्यंत ११ एफआयआर दाखल करत
वीसहून अधिक लोकांना अटक केली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असतानाच हिंसाचार उसळल्याने गृह विभागाने यामागे कट असल्याचाही संशय व्यक्त
केला. ईशान्य दिल्लीत रविवारी रात्रीपासून कायद्याचे समर्थक व विरोधकांमध्ये संघर्ष पेटला. सोमवारी हिंसाचाराने हेड कॉन्स्टेबल रतन
लाल यांचा बळी घेतला. त्यानंतर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल बैठकीत उपस्थित होते.

गृहमंत्र्यांच्या बैठकीत दिल्लीकरांना शांततेचे आवाहन करण्यात आले. केजरीवाल यांनीही आप आमदारांची बैठक बोलावली. मंगळवारी दिवसभराच्या जाळपोळीच्या घटनाक्रमानंतर एक हजारांपेक्षा जास्त सशस्त्र पोलिसांनी संपूर्ण ईशान्य दिल्लीचा ताबा घेतला.

पोलिसांच्या संख्येअभावी हिंसेत वाढ
पोलिसांची संख्या कमी असल्यामुळेच हिंसाचार भडकल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला दिली. त्यामुळेच हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शांततेचे प्रयत्न सुरू
अमित शहा यांनी दिल्ली सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. बैठक सकारात्मक ठरली, असे केजरीवाल म्हणाले. राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेत केजरीवाल यांनी शांततेचे आवाहन केले.

दिल्लीत बाहेरून येणाºयांना रोखायला हवे, असे सूचक विधान केजरीवाल यांनी केले. संशयितांना अटक करायला हवी, असेही ते म्हणाले. त्यानंतर दिल्लीच्या सर्व सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंसाचारप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :delhiदिल्ली