लखनौ विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्राध्यापकाला एका विद्यार्थिनीसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याप्रकरणी आणि परीक्षेचा प्रश्नपत्रिका लीक करण्याची ऑफर देऊन तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक असलेला आरोपी परमजीत सिंग याला सोशल मीडियावर त्याचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. या क्लिपमध्ये तो बीएससी अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीकडे शारिरीक सुखाची मागणी करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. "डार्लिंग, मी तुझ्यासाठी परीक्षेच्या पेपरची व्यवस्था केली आहे. परीक्षेपूर्वी परत ये, मी तो तुला इथेच देईन," असे तो कथितपणे बोलताना ऐकू येत आहे.
या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली आली होती. तिने या घटनेची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली, यानंतर परीक्षा नियंत्रक विद्यानंद त्रिपाठी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हसनगंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपी प्राध्यापकाची चौकशी सुरू आहे.
दुसरीकडे, सिंग याने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, कुलगुरू जे. पी. सैनी यांनी अंतर्गत तक्रार समितीला या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संस्थेची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक वातावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, तसेच विद्यापीठ अशा प्रकरणांमध्ये शून्य सहनशीलता धोरण पाळते.
ऑडिओ क्लिप व्हायरल
ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ आवारात निदर्शने करत आरोपी प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
'एबीव्हीपी'च्या लखनौ विद्यापीठ युनिटचे अध्यक्ष जय श्रीवास्तव म्हणाले, "अशा प्रतिष्ठित संस्थेत अशा नीच आणि विकृत मानसिकतेला जागा नाही." परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता भंग करणे आणि लैंगिक छळाच्या आरोपांखाली आरोपीला तुरुंगात पाठवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
Web Summary : A Lucknow University professor was arrested after an audio clip surfaced allegedly revealing him offering exam papers to a student in exchange for sexual favors. The university has launched an investigation, promising zero tolerance for such misconduct. Student groups are demanding the professor's suspension.
Web Summary : लखनऊ विश्वविद्यालय के एक प्रोफेसर को कथित तौर पर यौन संबंध के बदले एक छात्रा को परीक्षा पत्र की पेशकश करते हुए ऑडियो क्लिप सामने आने के बाद गिरफ्तार किया गया। विश्वविद्यालय ने जांच शुरू कर दी है और ऐसे कदाचार के प्रति शून्य सहिष्णुता का वादा किया है। छात्र समूह प्रोफेसर के निलंबन की मांग कर रहे हैं।