शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
स्वतःची कोचिंग सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
3
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
4
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
5
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
6
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
7
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
8
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
9
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
10
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
11
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
13
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
14
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
15
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
16
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
17
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
18
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
19
कोणत्याही कराराविना संपला डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
Daily Top 2Weekly Top 5

गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:36 IST

गाझामध्ये युद्धविराम लागू असतानाही इस्रायलने हवाई हल्ला करत हमासचा टॉप कमांडर 'इझ अल-दिन अल-हद्दाद' याला लक्ष्य केले आहे.

गाझा पट्टीमध्ये दोन्ही बाजूंनी युद्धविराम लागू झालेला असतानाही, या भागातील रक्ताचा खेळ थांबताना दिसत नाहीये. इस्रायलने गाझामध्ये थेट हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला लक्ष्य करत भीषण हवाई हल्ला केला आहे. शुक्रवार संध्याकाळी झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्यात हमासच्या लष्करी विंगचा मुख्य नेता 'इझ अल-दिन अल-हद्दाद' याला टार्गेट करण्यात आले होते. या हल्ल्यात हद्दाद मारला गेला की गंभीर जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हमासनेही यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी स्वतः या मोहिमेची पुष्टी केली आहे. लष्कराने शुक्रवारी संध्याकाळी गाझा शहरात दोन मोठे हवाई हल्ले केले, ज्यामध्ये हमासच्या 'कस्साम ब्रिगेड'चा सर्वात शक्तिशाली नेता अल-हद्दाद याच्या तळाला लक्ष्य करण्यात आले होते.

७ निष्पापांचा मृत्यू, डझनभर जखमी; निवासी इमारत अन् वाहनावर हल्ला

स्थानिक आरोग्य अधिकारी आणि पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीच्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा शहरात दोन ठिकाणी हल्ले केले. यातील एका हल्ल्यात एका निवासी इमारतीला, तर दुसऱ्या हल्ल्यात एका वाहनाला थेट उडवण्यात आले. या भीषण स्फोटांमध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून डझनभर नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शिफा रुग्णालय आणि सराया फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्रायली नेत्यांच्या मते, अल-हद्दाद हा ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होता.

नाजुक युद्धविराम नावापुरताच; गाझामध्ये रोज गोळीबार

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन्ही पक्षांमध्ये एक नाजुक युद्धविराम करार झाला होता. मात्र, कागदावर असलेल्या या कराराचा जमिनीवर कोणताही परिणाम दिसलेला नाही. गाझामध्ये जवळपास दररोज इस्रायली सैन्याकडून गोळीबार आणि हल्ले सुरूच आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, युद्धविराम कराराच्या घोषणेपासून आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

"आम्ही सोडणार नाही..." पंतप्रधानांची उघड धमकी

हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री काट्ज यांनी हमासला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. "आज ना उद्या, इस्रायल तुमच्यापर्यंत पोहोचणारच. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेल्या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही," अशी धमकी त्यांनी दिली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात जवळपास १,२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत गाझामध्ये तब्बल ७२,७०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

एकमेकांवर कराराच्या उल्लंघनाचे आरोप

सध्याचा युद्धविराम करार अत्यंत कमकुवत स्थितीत असून, इस्रायल आणि हमास दोन्ही बाजू एकमेकांवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. इस्रायल सातत्याने गाझाच्या किनारपट्टी भागात लपून बसलेल्या हमासच्या बड्या नेत्यांना शोधून कंठस्नान घालत आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने हमासचे मुख्य वार्ताकार खलील अल-हय्या यांच्या मुलाला अशाच एका कारवाईत ठार केले होते, आणि आता हमासच्या मुख्य कमांडरला टार्गेट केल्यामुळे हे युद्ध पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Targets Hamas Commander in Gaza Airstrike Amid Fragile Truce

Web Summary : Despite a ceasefire, Israel struck Gaza, targeting Hamas commander Al-Haddad. The attack killed civilians, raising tensions. Netanyahu vowed to pursue Hamas, while both sides accuse each other of violating the truce. The conflict continues, claiming more lives.
टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धWarयुद्ध