1 / 8Gold Silver Price Today May 16: गुंतवणूकदारांची नफावसुली आणि मजबूत डॉलरमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत शुक्रवारी ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज, सराफा बाजार, गुडरिटर्न्स आणि इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन या सर्वच ठिकाणी सोन्या-चांदीचे भाव कमालीचे घसरले आहेत.2 / 8मे डिलिव्हरीचं सोनं प्रति १० ग्रॅम ३,४२३ रुपयांनी घसरून १,५८,५५५ रुपयांवर आले. एकाच दिवसात यात २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दिवसभरातील व्यवहारात हे सोनं १,५८,१५० रुपयांपर्यंत खाली आलं होतं. 3 / 8जुलै डिलिव्हरीची चांदी प्रति किलो थेट २०,४५२ रुपयांनी कोसळून २,७०,६५० रुपयांवर बंद झाली. चांदीत एका दिवसात ७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली असून दिवसभरात तिचा भाव २,६८,५०४ रुपयांपर्यंत खालावला होता.4 / 8राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव तब्बल २१,६०० रुपयांनी घसरुन २.७५ लाख रुपये प्रति किलोग्रामवर आला. तर ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ३,२४० रुपयांनी घसरून १,६२,००० रुपये प्रति १० ग्रॅम झालं, जे गुरुवारी १,६६,००० रुपयांवर बंद झालं होतं. 5 / 8आयबीजेएनुसार गुरुवारी संध्याकाळी सोन्याचा भाव १,६१,१५९ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तो शुक्रवारी संध्याकाळी १,५८,२१० रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोनं १०४ डॉलरनं घसरून ४,५४८.४६ डॉलर प्रति औंस झाले, तर चांदी ५.२६ डॉलरनं घसरून ७८.२१ डॉलर प्रति औंसवर आली.6 / 8 वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, किमती उच्च पातळीवर असतानाही एप्रिल महिन्यात भारताची सोन्याची आयात ८१.६९ टक्क्यांनी वाढून ५.६२ अब्ज डॉलरवर पोहोचली. तर चांदीची आयात १५७.१६ टक्क्यांनी वाढून ४१.१ कोटी डॉलर झाली.7 / 8आर्थिक वर्ष २०२५-२६ चा विचार केला तर मूल्याच्या दृष्टीने सोन्याची आयात २४ टक्क्यांनी वाढून ७१.९८ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, मात्र वजनाच्या दृष्टीने ही आयात ४.७६ टक्क्यांनी घटून ७२१.०३ टन एवढीच राहिली. दरम्यान, सरकारनं १३ मे पासून सोने आणि चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून वाढवून थेट १५ टक्के केलं आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत आयातीचं हे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.8 / 8 दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १५८०६० रुपयांवर आला तर २२ कॅरेट सोन्याचा दर १४४९०० रुपयांवर आला. तर मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १५७९१० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १४४७५० रुपयांवर आला. कोलकात्यात २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे १५७९१० रुपये आणि १४४७५० रुपयांवर आला. तर दुसरीकडे चेन्नईत हा दर २४ कॅरेटसाठी १६१०८० रुपये आणि २२ कॅरेटसाठी १४७६५० रुपयांवर होता.