Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:04 IST

LPG Cylinder Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आज शनिवारी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. महागाईच्या या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. एलपीजीबाबत काय आहे गुड न्यूज पाहा.

LPG Cylinder Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आज शनिवारी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. महागाईच्या या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटचे मार्च महिन्यात ६० रुपयांनी वाढवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांमधील घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 

मुंबई: ९१२.५० रुपये
दिल्ली: ९१३ रुपये
कोलकाता: ९३९ रुपये
चेन्नई: ९२८.५० रुपये
गुरुग्राम: ९२१.५० रुपये

चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट

व्यावसायिक सिलिंडरचे दर

मार्च महिन्यापासून आतापर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत तब्बल ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेवटच्या वेळी या सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आजचे प्रमुख शहरांमधील दर खालीलप्रमाणे आहेत:

मुंबई: ३,०२४ रुपये
नवी दिल्ली: ३०,७६१.५० रुपये
कोलकाता: ३,२०२ रुपये
चेन्नई: ३,२३७ रुपये
गुरुग्राम: ३,०८८ रुपये
बंगळुरू: ३,१५२ रुपये

दोन मोठे गॅस टँकर भारताकडे रवाना

देशात सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. 'स्यमि' आणि 'एनवी सनसाइन' हे दोन एलपीजी टँकर 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' पार करून भारताच्या दिशेने निघाले आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, या टँकर्सनी १३ आणि १४ मे रोजी हा मार्ग पार केला असून ते १६ आणि १८ मे रोजी भारतीय बंदरांवर पोहोचतील.

भारत आपल्या गरजेचा बहुतांश गॅस परदेशातून आयात करतो, ज्यामध्ये ९०% गॅस आखाती देशांतून येतो. पश्चिम आशियातील युद्धामुळे हा सागरी मार्ग प्रभावित झाला असून देशात एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. यावर तोडगा म्हणून भारत सरकारनं देशांतर्गत पातळीवर एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिलेत.

सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल

एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं १ मे पासून नियमांमध्ये मोठे बदल केलेत.

आता ओटीपी (OTP) शिवाय सिलेंडर मिळणार नाही.
नवीन नियमांनुसार, ग्रामीण भागात किमान ४५ दिवस आणि शहरी भागात २५ दिवसांपूर्वी एलपीजी सिलिंडरचं बुकिंग करता येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Good news: LPG prices revealed; know latest rates before booking.

Web Summary : Domestic LPG prices remain stable, offering relief. Commercial cylinder costs surged 47% since March. Two LPG tankers are en route to India amid supply concerns. New OTP-based delivery and booking rules are in effect.
टॅग्स :गॅस सिलेंडरसरकारअमेरिका-इस्रायल-इराण वॉर