शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 08:20 IST

ट्रम्प म्हणाले, आपली चीनभेट जगाच्या इतिहास नोंद करणारी, अविस्मरणीय, मैलाचा दगड;  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दोन दिवसांचा चीन दौरा शुक्रवारी संपला

बीजिंग : इराणयुद्धावर कोणताही तोडगा न निघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दोन दिवसांचा चीन दौरा शुक्रवारी संपला. दोन्ही देशांनी या दौऱ्याचे वर्णन ऐतिहासिक आणि मैलाचा दगड असे केले असले तरी या दौऱ्यात अमेरिका-चीनमध्ये कोणताही करार झाला नाही.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी, ट्रम्प यांची भेट ऐतिहासिक असून आम्ही आर्थिक, व्यापारी संबंध स्थिर ठेवणे, विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवणे, या मुद्यांवर सहमती असल्याचे जिनपिंग म्हणाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे ‘अमेरिकेला पुन्हा महान’ बनवू इच्छितात, तर मी चिनी जनतेला ‘राष्ट्रीय पुनरुत्थानाकडे’ नेण्यासाठी समर्पित आहे, असे जिनपिंग यावेळी म्हणाले. 

'माझा जुना मित्र' 

जिनपिंग हे माझे जुने मित्र आहेत. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी प्रामाणिक व संवाद सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. 
 
बागेतील फुलांमध्ये सैर

शी जिनपिंग यांच्या बीजिंगमधील झोंगनानहाई या निवासस्थानात ट्रम्प यांच्यासाठी दुपारच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. यात मेजवानी नंतर दोघांमध्ये खासगी बैठकही झाली. या संदर्भात नंतर कोणतेही खुलासे झाले नाहीत. 

जिनपिंग यांच्या निवासस्थानात मोठी बाग असून, तेथे देशविदेशातील झाडे आहेत. या बागेत दोन्ही नेते चालत, गप्पा मारत, बागेतील झाडे-फुलांचे कौतुक करत चालत होते. ट्रम्प यांनी बागेचे कौतुकही केले, तसेच आपला दौरा अतिशय यशस्वी, जगाच्या इतिहासात नोंद करणारा, अविस्मरणीय झाल्याची प्रतिक्रिया दिली. 

चीनने थेट उत्तरे टाळली

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वादग्रस्त मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या कराराचे तपशील देण्याचे टाळले. इराण युद्ध संपवण्याबाबत किंवा भविष्यात अमेरिकेचे तेल खरेदी करारावर विचारले असता, चीन जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळीच्या स्थिरतेसाठी सर्व पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे. 

आखाती देशात शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य आहे, असे उत्तर देण्यात आले. चीनकडून अमेरिकेला दुर्मीळ धातूंचा पुरवठा करण्याबाबत विचारले असता, चीन नेहमीच जागतिक पुरवठा साखळीच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, असे मोघम उत्तर देण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's China Visit Ends Without Deal; Iran Issue Unresolved

Web Summary : Trump's China visit concluded without an Iran deal. Discussions focused on economic ties and cooperation. Both leaders expressed mutual respect, but details on resolving contentious issues remained vague. China emphasized global stability over specific commitments, avoiding direct answers about Iran and rare earth minerals.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनAmericaअमेरिकाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर