ठाणे : गेली साडेतीन दशके मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात बहुमोल कार्य करणारे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात ‘आयपीएच’ या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता परळ येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी सविता, मुलगा कबीर, मानसकन्या सुखदा असा मोठा परिवार आहे. ‘शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट’ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दिलखुलास हास्याची दैवीदेणगी त्यांना लाभली होती.
डॉ. नाडकर्णी यांना मार्च महिन्यात पॅनक्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते. त्यानंतर ६ मे रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
शस्त्रक्रियेनंतर ते बरे होण्याच्या प्रक्रियेत होते. मात्र, १३ मेच्या रात्री त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना ॲस्पिरेशन न्यूमोनिया झाला. त्याच रात्री आतड्याला झालेल्या छिद्रामुळे त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली.
सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. मात्र, त्यानंतर हायपोटेन्शनचा त्रास होऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
Web Summary : Renowned psychiatrist Dr. Anand Nadkarni, founder of IPH, passed away at 68 due to complications following surgery for a tumor. Known as the 'psychiatrist of the wise,' his death is mourned as the loss of a valuable resource in mental health.
Web Summary : प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉ. आनंद नाडकर्णी, IPH के संस्थापक, का ट्यूमर के लिए सर्जरी के बाद जटिलताओं के कारण 68 वर्ष की आयु में निधन हो गया। 'बुद्धिमानों के मनोचिकित्सक' के रूप में जाने जाने वाले, उनके निधन को मानसिक स्वास्थ्य में एक मूल्यवान संसाधन की हानि के रूप में शोक व्यक्त किया जा रहा है।