नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याची भीती अखेर खरी ठरली. निवडणुका संपताच १६ दिवसांतच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
कच्च्या तेलाचे दर भडकलेले असतानाही निवडणुकांच्या काळात इंधन दरवाढ टाळण्यात आली होती. आता दरवाढीनंतर राज्यानुसार व्हॅटचे दर वेगळे असल्याने प्रत्येक शहरात नवे भाव कमी-जास्त प्रमाणात बदलले आहेत.
इंधन दरवाढ नाममात्रच
पेट्रोल-डिझेलच्या ३ रुपयांच्या दरवाढीवर इंडियन ऑइलचे संचालक अरविंद कुमार यांनी ही वाढ 'खूपच अल्प' असल्याचे म्हटले आहे. जागतिक दबाव असूनही पुरवठा सुरळीत ठेवण्यास तेल शुद्धीकरण केंद्रे १००% क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात नागरिकांनी इंधन बचतीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महामुंबईतील नवे पेट्रोल दर
मुंबई : १०३.५४ +३.१४ = १०६.६८
नवी मुंबई : १०३.६४+३.१३ = १०६.७७
ठाणे : १०३.५९+३.२५ = १०६.८४
रायगड : १०४.०४+३.१४ = १०७.५४
पेट्रोल निर्यातीवर टॅक्स
केंद्र सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपये विंडफॉल गेन टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील अतिरिक्त शुल्कात कपात करण्यात आली आहे. हे नवे दर १६ मेपासून लागू होणार आहेत.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस शून्य ठेवण्यात आला आहे. तसेच देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील विद्यमान करांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सरकारमधील 'नेतृत्व संकट' व 'अकार्यक्षमता' देशातील आर्थिक संकटास जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय स्थितीचे कारण पुढे करून सामान्य जनतेवर महागाई लादली जात असून, निवडणुकीनंतर दिलेला हा चटका जनतेची लूट आहे.
-मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
विदेश प्रवासावर कर नाही
परदेश प्रवासावर कर, उपकर किंवा अधिभार लावण्याबाबत सरकार विचार करत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. अशा वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले.
Web Summary : Post-election, fuel prices surge; petrol and diesel rise by ₹3 per liter. Export tax imposed on petrol, while taxes on diesel and ATF reduced. Congress criticizes the hike as exploitative.
Web Summary : चुनाव के बाद ईंधन की कीमतों में उछाल; पेट्रोल और डीजल ₹3 प्रति लीटर महंगा। पेट्रोल पर निर्यात कर लगाया गया, जबकि डीजल और एटीएफ पर कर कम किया गया। कांग्रेस ने इस वृद्धि को शोषणकारी बताया है।