नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट-युजी’ फेरपरीक्षा आता २१ जून रोजी होणार आहे. या परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत गैरप्रकारांबाबत ‘झीरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाईल, असे स्पष्ट केले.
दोषींवर कठोर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आता पुन्हा या परीक्षेत काही घोटाळे करण्याचा प्रयत्न झाला तर कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही सवलतीही मिळणार
- परीक्षेचा कालावधी १५ मिनिटे वाढवला.
- विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पसंतीचे परीक्षा शहर निवडण्याची संधी.
- यासाठी विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा कालावधी मिळणार आहे.
- पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार.
आरोपीला ६ दिवस कोठडी
अहिल्यानगरचा आरोपी धनंजय लोखंडेला दिल्लीतील विशेष न्यायालयाने ६ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
शुभमच्या संपर्कातील लोकांची चौकशी : नाशिक : संशयित शुभम खैरनारशी सातत्याने संपर्कात असलेले काहीजण रडारवर असून सीबीआयच्या पथकाकडून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
क्लास चालकाची चौकशी
प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याची चौकशी करून त्याला पुण्यातून अटक केल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची घरी जाऊन चौकशी केली. सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत पथक घरात होते.
Web Summary : NEET-UG re-exam, canceled due to paper leaks, will be held June 21st. Next year the exam will be online. Students get extra time, city choice. Culprits will face strict action; one arrested.
Web Summary : पेपर लीक के कारण रद्द हुई नीट-यूजी परीक्षा 21 जून को होगी। अगले वर्ष से परीक्षा ऑनलाइन होगी। छात्रों को अतिरिक्त समय और शहर चुनने का विकल्प मिलेगा। दोषियों पर सख्त कार्रवाई होगी; एक गिरफ्तार।