अबुधाबी : भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने शुक्रवारी ऊर्जा, संरक्षण, पेट्रोलियम साठा, एलपीजी पुरवठा व शिपिंग क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अबुधाबीने भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली.
पंतप्रधाननरेंद्र मोदी हे सध्या यूएई दौऱ्यावर असून, तेथील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हे करार झाले.
यात इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड व अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातील ऊर्जा सहकार्याचा समावेश आहे. एलपीजी पुरवठ्यासाठी स्वतंत्र सामरिक सहकार्य करारही यावेळी करण्यात आला.
भारत शांततेसाठी सर्वतोपरी मदतीस तयार : पंतप्रधान
भारत व यूएईमध्ये गुजरातमधील वाडिनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र, बंदरे व किनारी पायाभूत सुविधा विकास, तसेच कौशल्य विकास कार्यक्रम याबाबतही करार झाले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षात यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला. भारत शांततेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.
Web Summary : UAE and India signed deals in energy, defense, and LPG. Abu Dhabi announced a $5 billion investment in India. Agreements include energy cooperation and LPG supply. India offered support for peace in West Asia.
Web Summary : यूएई और भारत ने ऊर्जा, रक्षा और एलपीजी में समझौते किए। अबू धाबी ने भारत में 5 अरब डॉलर के निवेश की घोषणा की। समझौतों में ऊर्जा सहयोग और एलपीजी आपूर्ति शामिल है। भारत ने पश्चिम एशिया में शांति के लिए समर्थन की पेशकश की।