जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या हंटा व्हायरसबद्दल एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली. हा धोकादायक व्हायरस मानवी शरीरात नेमका किती काळ जिवंत राहू शकतो आणि संक्रमित व्यक्तीपासून किती काळापर्यंत दुसर्याला संक्रमित करू शकते, याबद्दल अद्याप वैज्ञानिकांना अचूक माहिती मिळालेली नाही. हा वाढता धोका लक्षात घेऊन आता जागतिक आरोग्य संघटनेने यावर एक विशेष अभ्यास सुरू केला आहे.
नुकतेच एप्रिल महिन्यात एका क्रूझ जहाजावर हंटाव्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव झाला. या जहाजावरील प्रवासी आणि कर्मचारी मिळून ११ जणांना या व्हायरसची संसर्ग झाला. तर, ३ जणांचा यात मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक देशांनी क्रूझवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हंटा व्हायरस हा केवळ हवेतून किंवा उंदरांच्या संपर्कात आल्याने पसरत नाही, तर तो मानवी शरीरातूनही पसरू शकतो. यामध्ये लाळ, आईचे दूध आणि पुरुषांचे वीर्य यांचा समावेश आहे. हा व्हायरस लैंगिक संबंधांमुळे किंवा अत्यंत जवळच्या संपर्कात आल्यामुळेही पसरू शकत असल्यामुळे संशोधकांची चिंता अधिक वाढली आहे. एका अभ्यासात असाही दावा करण्यात आला आहे की, हा व्हायरस पुरुषांच्या वीर्यात तब्बल ६ वर्षांपर्यंत राहू शकतो, ज्यामुळे बरे झाल्यानंतरही संसर्गाचा धोका कायम राहतो.
डब्लूएचकडून संशोधन सुरू
जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया व्हान केरखोवे यांनी सांगितले की, हंटा व्हायरसचा मानवी शरीरातील जीवनक्रम समजून घेण्यासाठी नॅचरल हिस्ट्री स्टडी सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासांतर्गत, क्वारंटाईनमध्ये असलेल्या संक्रमित लोकांच्या रक्ताचे, लाळेचे आणि वीर्याचे नियमित नमुने घेतले जात आहेत. तसेच हा व्हायरस शरीरात किती दिवस, आठवडे किंवा महिने सक्रिय राहतो, हे शोधून काढले जाईल.
सध्या कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत
या व्हायरसवर सध्या कोणतेही विशिष्ट किंवा खात्रीशीर औषध उपलब्ध नाही. डॉक्टरांकडून रुग्णांना केवळ सपोर्टिव्ह केअर दिली जाते, ज्यामध्ये ऑक्सिजन देणे, वेदनाशामक औषधे आणि फुफ्फुसांची काळजी घेणे समाविष्ट आहे. जर हा व्हायरस शरीरात दीर्घकाळ सक्रिय राहत असल्याचे सिद्ध झाले, तर रुग्णांचा क्वारंटाईन कालावधी वाढवावा लागू शकतो.
पुढील पाऊल काय असेल?
येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत या संशोधनाचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे. या निष्कर्षांवरूनच हे स्पष्ट होईल की, संक्रमित रुग्णाला किती दिवस इतरांपासून वेगळे ठेवावे लागेल. तसेच, बरे झालेल्या पुरुषांना लैंगिक संबंधांबाबत आणि स्तनपान करणाऱ्या मातांना काय काळजी घ्यावी लागेल? याविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. सध्याच्या परिस्थितीत सतर्कता आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे हाच या व्हायरसपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
Web Summary : Scientists are unsure how long Hantavirus persists in humans or its transmissibility period. WHO has initiated research due to recent outbreaks and potential transmission via bodily fluids, including semen, where the virus may survive for years. No specific treatment exists; supportive care is the only option.
Web Summary : वैज्ञानिकों को नहीं पता कि हंतावायरस मानव शरीर में कब तक रहता है या यह कब तक फैलता है। डब्ल्यूएचओ ने हाल के प्रकोपों और वीर्य सहित शारीरिक तरल पदार्थों के माध्यम से संभावित संचरण के कारण शोध शुरू किया है, जहां वायरस वर्षों तक जीवित रह सकता है। कोई विशिष्ट उपचार नहीं; सहायक देखभाल ही विकल्प है।