शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
5
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
6
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
7
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
8
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
9
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
10
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
11
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
12
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
13
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
14
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
15
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
16
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
17
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
18
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
19
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
20
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:55 IST

समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी भरडले जात आहेत.

ठाणे : मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी भरडले जात आहेत. प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवत शुक्रवारी नवी मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात बैठक घेतली. त्यात सकारात्मक चर्चा होऊन ६ महिन्यांत सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण करणे, पावसाळापूर्व व दैनंदिन कामे करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये म्हस्के यांनी हा विषय मांडला. वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार २००३ आणि २००८ मध्ये संपले आहेत. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी एकही देखभाल करार झालेला नाही. 

खा. नरेश म्हस्के यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. बैठकीला सिडकोच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर, मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत म्हात्रे उपस्थित होते.

बंद तिकीट बुकिंग खिडक्या उघडा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हायवेचे ६- लेनिंग आणि विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा विकास होत आहे. त्यातून विद्यमान रेल्वे पायाभूत सुविधांवर ताण येणार आहे. त्यामुळे तातडीने सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके (मानखुर्द-बेलापूर, ठाणे-तुर्भे-वाशी-नेरुळ, नेरुळ-उरण मार्ग) अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी, देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, बंद तिकीट बुकिंग खिडक्या उघडाव्यात तसेच रबाळे, दिघा, ऐरोली स्थानक परिसरातील भुयारी मार्ग, फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू करावे, अशा सूचना त्यांनी बैठकीत केली.
 

English
हिंदी सारांश
Web Title : CIDCO Stations to Central Railway: Navi Mumbaikars' Local Travel to Improve

Web Summary : Coordination issues between CIDCO and Central Railway have long troubled Navi Mumbai commuters. After discussions, CIDCO will transfer stations to Central Railway within six months. This transfer and maintenance work promise smoother local travel for residents.
टॅग्स :cidcoसिडको लॉटरीcentral railwayमध्य रेल्वेNavi Mumbaiनवी मुंबईnaresh mhaskeनरेश म्हस्के