Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:46 IST2026-05-16T12:44:06+5:302026-05-16T12:46:49+5:30

Abu Bilal ISIS leader killed : अमेरिकेने नायजेरियातील आयसिसचा दुसरा मोठा नेता अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार केल्याचा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहितीनुसार, ही कारवाई अमेरिकन आणि नायजेरियन सैन्याने संयुक्तपणे केली होती. अल-मिनुकी हा आयसिसचा एक सर्वोच्च कमांडर मानला जात होता.

Abu Bilal ISIS leader killed Big action! America blows up ISIS's number 2 leader; Abu Bilal killed in the jungles of Nigeria | Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा

Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा

Abu Bilal ISIS leader killed : अमेरिकेने नायजेरियामध्ये आयसिसचा दुसरा सर्वोच्च नेता, अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईची घोषणा केली. ही कारवाई अमेरिकन सैन्य आणि नायजेरियन सैन्याने संयुक्तपणे पार पाडल्याची त्यांनी माहिती दिली. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, त्यांच्या आदेशानुसार, अमेरिकन सैन्य आणि नायजेरियन सैन्याने एक अत्यंत कठीण आणि गुप्त मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट

ट्रम्प यांच्या माहितीनुसार, अबू-बिलाल अल-मिनुकी आफ्रिकेत लपून बसला होता आणि आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटत होते, पण अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती होती. ट्रम्प म्हणाले की, अल-मिनुकी हा जगातील सर्वात सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. आता आफ्रिकेतील लोकांमध्ये भीती पसरवू शकणार नाही किंवा अमेरिकन लोकांविरुद्ध हल्ल्यांचे कट रचू शकणार नाही. ट्रम्प म्हणाले की, या कारवाईने आयसिसच्या जागतिक नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी या मोहिमेतील सहकार्याबद्दल नायजेरियन सरकारचे आभारही मानले.

अबू-बिलाल कोण होता?

अबू-बिलाल अल-मिनुकी हा आयसिसचा दुसरा सर्वोच्च जागतिक नेता मानला जात होता. तो अबू बक्र इब्न मुहम्मद इब्न अली अल-मनुकी या टोपणनावानेही ओळखला जात असे. तो आफ्रिकेच्या साहेल प्रदेशात बऱ्याच काळापासून सक्रिय होता.

साहेल हा आफ्रिकेचा एक विशाल प्रदेश आहे, जो अटलांटिक महासागरापासून तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेला आहे. हा प्रदेश सहारा वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या हिरव्यागार प्रदेशांच्या दरम्यान वसलेला आहे. यामध्ये सेनेगल, मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजर, नायजेरिया, चाड आणि सुदान यांसारख्या देशांचा समावेश आहे.

Web Title : अमेरिका ने नाइजीरिया में आईएसआईएस नेता अबू बिलाल को मार गिराया

Web Summary : अमेरिकी सेना ने नाइजीरियाई सेना के साथ मिलकर आईएसआईएस के शीर्ष नेता अबू बिलाल अल-मिनुकी को मार गिराया। राष्ट्रपति ट्रम्प ने इस सफल अभियान की घोषणा करते हुए कहा कि अल-मिनुकी एक खतरा था जिसे खत्म कर दिया गया। यह कार्रवाई आईएसआईएस के वैश्विक नेटवर्क को एक बड़ा झटका है।

Web Title : US Forces Eliminate ISIS Leader Abu Bilal in Nigeria

Web Summary : US forces, in conjunction with the Nigerian army, killed Abu Bilal al-Minuki, a top ISIS leader, in Nigeria. President Trump announced the successful operation, stating al-Minuki was a threat eliminated. The action delivers a significant blow to ISIS's global network.